आज (25 डिसेंबर) ख्रिसमस हा सण जगभर साजरा केला जात आहे. या सणानिमित्त सर्व लोक एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. यामध्ये आता विविध खेळांच्या खेळाडूंनी सुद्धा उडी घेतली आहे आणि त्यांनी आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावरून ख्रिसमस सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर सचिन तेंडुलकरसोबत अन्य दिग्गज खेळाडूंनी फोटो आणि व्हिडिओ शेअर करून आपल्या जगभरातील चाहत्यांना ख्रिसमस सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
क्रिकेटचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरने ट्विटरवर ख्रिसमसच्या शुभेच्छा देताना एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो स्वत: सांता क्लॉजची वेषभूषा केलेला दिसून येत आहे. ट्विट करताना त्याने लिहिले, “ख्रिसमसच्या सर्वांना शुभेच्छा, ख्रिसमस नेहमी लोकांना एकत्र आणण्यासाठी ओळखला जातो. चला, याला खास बनवू. आपल्या जवळच्या लोकांना छोट्या पद्धतीने पण तुम्हाला ख्रिसमस शानदार जाओ.”
Merry Christmas everyone! 🎄
Christmas has always been about togetherness and giving.
Let's make it special for the people around us, even in the smallest of ways. Have a blessed one. pic.twitter.com/jZI32o9jOj— Sachin Tendulkar (@sachin_rt) December 25, 2020
सध्या क्वारंटाईनमध्ये असलेल्या रोहित शर्माने सुद्धा इंस्टाग्रामवर आपल्या मुलीचा आणि पत्नीचा फोटो शेअर करत लिहिले, “ख्रिसमसच्या शुभेच्छा, तुम्हाला मिस करतोय.”
https://www.instagram.com/p/CJNST91BBc1/?igshid=1u4h50tnikry9
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पालकत्व रजेवर मायदेशी आला आहे. त्याने ट्विटरवरुन ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Wishing each and everyone a very Merry Christmas. 🎄⭐😀
— Virat Kohli (@imVkohli) December 25, 2020
ऑस्ट्रेलिया संघाचा प्रमुख फलंदाज डेविड वॉर्नरने इंस्टाग्रामवर आपल्या मुलींचा आणि पत्नीचा फोटो शेअर करताना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
https://www.instagram.com/p/CJNK9XLL_hI/?igshid=1nyvctoqm2lar
त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेविड मिलरने या खास क्षणी चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
https://www.instagram.com/p/CJMYqjWHYw1/?utm_source=ig_web_copy_link
आयपीएलमधील फ्रँचायझी सनरायजर्स हैदराबाद संघाने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये सनराइजर्स हैदराबाद संघाचे खेळाडू ख्रिसमसच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.
https://www.instagram.com/p/CJNKhRfKIO6/?igshid=1e0iwuk7nngo
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर पालकत्व रजेवर मायदेशी परतला आहे.. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया संघाचा सलामी फलंदाज डेविड वॉर्नर हा दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया संघातून बाहेर आहे. तसेच भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा सुद्धा दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. दुसर्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्त्व अजिंक्य रहाणे करणार आहे.
पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने भारताचा 8 विकेट्सने पराभव केला होता. या सामन्यात भारतीय संघ दुसर्या डावात 36 धावांवर गारद झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
‘मला माझ्या फलंदाजी क्रमाबाबत लवचीकता ठेवायचीय’, ऑस्ट्रेलियन खेळाडूचे वक्तव्य
भारतीय संघ दबावात असल्याचे स्पष्ट; दुसर्या कसोटीच्या संघनिवडीवर माजी फलंदाजाची प्रतिक्रिया