भारतामध्ये क्रिकेट खेळाला खूप महत्त्व आहे. भारतामध्ये क्रिकेट आणि क्रिकेटपटूंना एक वेगळाच प्रतिसाद मिळतो. चाहत्यांना क्रिकेटर्सच्या खेळाव्यतिरिक्त त्यांचा खासगी आयुष्यातल्या गोष्टी जाणून घायची खूप हौस असते. क्रिकेटपटू कुठे फिरायला गेले, त्यांनी कोणते कपडे वापरले किंवा त्यांचे फोटो आणि व्हिडिओ इत्यादी. असेच काहीसे त्यांच्या मुलांबाबतही असते. सचिन तेंडुलकरच्या मुलीच्या बाबतीतही असेच काहीसे आहे. सचिनच्या मुलीच्या नावामागे एक रहस्य आहे. (sachin tendulkar daughter sara tendulkar secret hidden name sara tendulkar huge fan shah rukh khan)
भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या मुलीचे नाव आहे ‘सारा.’ साराचे नाव सुद्धा भारतातल्या स्टार किड्समध्ये घेतले जाते. सुंदर आणि आकर्षित मुलींमध्ये साराची गणना होते. इंस्टाग्राममवर साराचे १२ लाखांपेक्षा अधिक फोलोवर्स आहेत. सारा सुंदर पेहराव आणि विनम्र स्वभाव असणारी मुलगी आहे.
https://www.instagram.com/p/CDOm4kYgBhk/?utm_source=ig_web_copy_link
सारा अभिनेता ‘शाहरुख खान’ची खूप मोठी चाहती आहे. शाहरुख सुद्धा साराला आपल्या मुली सारखे मानतो. म्हणूनच साराच्या २१व्या वाढदिवसादिवशी शाहरुखने साराला व्हिडिओद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या होत्या. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओला साराने उपशीर्षक दिले होते की, “आजवरचा सर्वात चांगला वाढदिवस.” दरम्यान, शाहरुखने सारासाठी एक गाणे सादर केले होते. साराचे वडील सचिन आणि शाहरुख खूप चांगले मित्र असून, २०१९च्या आयसीसी विश्वचषकानंतर त्यांनी एकत्र जेवण्याचेही ठरवले होते.
https://www.instagram.com/p/Bo4OkZWnAFb/?utm_source=ig_web_copy_link
साराच्या नावामागील रहस्य
सचिनच्या मुलीच्या नावामागे एक मजेशीर रहस्य आहे. साराचा जन्म १२ ऑक्टोबर, १९९७ रोजी मुंबई येथे झाला. दरम्यान, ११ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर कॅनडामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये ५ सामन्यांची वनडे मालिका खेळवण्यात आला होती. ज्याला ‘फ्रेंडशिप कप’ असे नाव देण्यात आले होते. या स्पर्धेचे आयोजन ‘सहारा’ ग्रूपने केले होते. ४-१च्या फरकाने भारताने पाकिस्तान संघाला हरवले होते. त्यावेळेस भारतीय संघाचा कर्णधार सचिन होता. बरोबर २० दिवसाने साराचा जन्म झाला आणि सचिनने सहारा वरून आपल्या मुलीचे नाव सारा असे ठेवले.
https://www.instagram.com/p/BnZMH55HUOE/?utm_source=ig_web_copy_link
साराने आपले शालेय शिक्षण धिरुबाई अंबानी इंटरनॅशनल शाळेतून पूर्ण केले. तसेच युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून वैद्यकीय पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
युजवेंद्र चहलच्या पत्नीने केला ‘विरुष्का’सोबतचा फोटो शेअर; अनुष्काबद्दल बोलताना म्हणाली, ‘ती खूप…’
जेव्हा अव्वल गोलंदाज राशिदने खाल्ला होता सपाटून मार, इंग्लंडच्या फलंदाजांनी ठोकले होते ११ षटकार
धोनीने तुझी कारकिर्द संपुष्टात आणली? चाहत्याच्या प्रश्नावर सेहवागने दिले होते ‘असे’ उत्तर