उत्तर प्रदेश येथील वाराणसी येथे होणाऱ्या नव्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचा पायाभरणी समारंभ शनिवारी (23 सप्टेंबर) पार पडला. या सोहळ्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व दहा माजी भारतीय क्रिकेटपटूंनी हजेरी लावली. या कार्यक्रमात भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याच्या हस्ते पंतप्रधानांना भारतीय संघाची जर्सी भेट देण्यात आली.
या पायाभरणी समारंभासाठी बीसीसीआयचे पदाधिकारी तसेच माजी भारतीय क्रिकेटपटू वाराणसी येथे दाखल झाले. यामध्ये बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शहा यांच्यासह माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर, रवी शास्त्री, दिलीप वेंगसरकर, कपिल देव इत्यादींचा समावेश होता.
या कार्यक्रमात बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक खास बॅट भेट म्हणून दिली. तर, सचिन तेंडुलकर याने पंतप्रधानांना भारतीय संघाची प्रदान केली. क्रमांक एकच्या या जर्सीवर नमो अशी अक्षरे लिहिली आहेत. सोशल मीडियावर हे छायाचित्र व्हायरल होत आहे.
या स्टेडियमची क्षमता जवळपास 40,000 पेक्षा जास्त असेल. त्याचबरोबर स्टेडियमवर असलेल्या डोमची रचना डमरूप्रमाणे दिसून येईल. तर फ्लड लाइट्स या त्रिशुळाच्या आकारावर बसवण्यात येतील. तर स्टेडियमचे मुख्य प्रवेशद्वार बेलाच्या पानाच्या आकाराचे असेल. तर प्रेक्षक बसण्यासाठी गंगा घाटावरील रचनेप्रमाणे जागा बनवण्यात येईल. या स्टेडियमच्या कामासाठी 450 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यातील 330 कोटी बीसीसीआय देईल. तर उर्वरित खर्च उत्तर प्रदेश सरकार करणार आहे. कानपूर व लखनऊ येथील स्टेडियमनंतर उत्तर प्रदेशमधील हे तिसरे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असेल.
(Sachin Tendulkar Gifts Team India Jersey To PM Narendra Modi At Varanasi Cricket Stadium Opening)
महत्वाच्या बातम्या –
खेळाडू वृत्ती! बांगलादेश-न्यूझीलंड सामन्यात फॅमिली वाली फिलिंग, लिटन दासचा धाडसी निर्णय
न भूतो…! विश्वचषक स्पर्धांमध्ये खणकलंय शाकिबचं नाणं, ‘हा’ भीमपराक्रम करणारा बांगलादेशचा एकमेव धुरंधर