Sachin Tendulkar statement: भारतीय संघाने केपटाऊन कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट्सने पराभव केला. अशा प्रकारे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 2 कसोटी सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली. त्याच वेळी, सेंच्युरियनमध्ये, दक्षिण आफ्रिकेला प्रथमच आशियाई संघाकडून कसोटी सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. भारतीय संघाच्या विजयात गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मोहम्मद सिराज याने पहिल्या डावात 6 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह याने दुसऱ्या डावात 6 फलंदाजांना तंबूत धाडले.
मात्र, माजी दिग्गज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने भारतीय संघाच्या शानदार विजयावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याचेही कौतुक केले. भारतीय संघाच्या विजयानंतर सचिन तेंडुलकरने ट्विटर पोस्टमध्ये करत लिहिले की, “मालिकेत बरोबरी केल्याबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन. पण एडन मार्करम (Aiden Markram) याने अप्रतिम फलंदाजी दाखवली, कारण कधीकधी अशा खेळपट्टीवर आक्रमकपणे खेळणे हा सर्वोत्तम पर्याय असतो. जसप्रीत बुमराहने उत्कृष्ट गोलंदाजी केली. अशा विकेटवर कोणत्या लाईन आणि लेन्थने गोलंदाजी करावी हे त्याने दाखवले.” (sachin tendulkar lauds jasprit bumrah performance following india historic win in cape town ind vs sa)
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या 55 धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) याने 6 विकेट्स घेतल्या. यानंतर भारतीय संघाने पहिल्या डावात 153 धावा केल्या. त्यामुळे पहिल्या डावात भारतीय संघाला 98 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेचा संघ 176 धावांत सर्वबाद झाला. यावेळी जसप्रीत बुमराहने 6 विकेट्स घेतल्या. भारतीय संघाने 7 विकेट्स राखून हे लक्ष्य गाठले आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत संपवली. (IND vs SA Sachin Tendulkar impressed with Bumrah’s bowling says He showed that)
हेही वाचा
डीन एल्गरबाबत भावूक करणारा व्हिडिओ! सर्वांनी स्वाक्षरी केलेली विराटची जर्सी आफ्रिकी दिग्गजाला भेट
कॅच घेण्यात माहिर असलेले जगातील क्रिकेटर्स, विराटच्याही पुढे आहे ‘हा’ क्रिकेटर