Tuesday, March 21, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वानखेडे स्टेडियमवर उभारण्यात येणार ‘मास्टर ब्लास्टर’ सचिनचा पूर्णाकृती पुतळा! MCA कडून 50 व्या वाढदिवसाचे गिफ्ट

February 28, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/ICC

Photo Courtesy: Twitter/ICC


भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू व सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. सचिनच्या 50 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबई क्रिकेट संघटना (एमसीए) वानखेडे स्टेडियम येथे सचिनचा पूर्णाकृती पुतळा उभारणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या पुतळ्याचे लोकार्पण सचिनच्या वाढदिवशी अथवा वनडे विश्वचषकादरम्यान करण्यात येण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनेक विक्रमांची नोंद सचिनच्या नावे आहे. सचिनने क्रिकेटचे बाळकडू याच मैदानावर घेतले होते. इतकेच नव्हे तर आपल्या चोवीस वर्षांच्या प्रदीर्घ आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीची अखेरही त्याने याच मैदानावर केली. भारतीय क्रिकेटमधील त्याचे योगदान लक्षात घेता एमसीएने हा निर्णय घेतला. एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार,

“सचिन भारतरत्न आहे. त्याचे या खेळासाठी काय योगदान आहे हे कोणालाही सांगण्याची गरज नाही. मागील महिन्यात मी त्याला याबाबत कल्पना दिली. त्याच्या संमतीनंतरच आम्ही ही प्रक्रिया सुरू केली आहे.” सचिन आपला 50 वा वाढदिवस 23 एप्रिल रोजी साजरा करेल. याच दिवशी या पुतळ्याचे लोकार्पण होण्याची शक्यता अधिक आहे. तसे न झाल्यास थेट ऑक्टोबर महिन्यात वन डे विश्वचषकावेळी त्याचे लोकार्पण होऊ शकते.

या प्रकाराबाबत प्रतिक्रिया देताना सचिन म्हणाला,

“माझ्यासाठी हे खरंच सरप्राईज होते. माझ्या कारकिर्दीची सुरुवात येथे झाली आणि शेवटही येथेच झाला. या मैदानाशी माझ्या कधीही न विसरता येण्यासारख्या आठवणी आहेत. याच मैदानावर उंचावलेला विश्वचषक माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठा क्षण आहे.”

वानखेडे स्टेडियमवर सचिनच्या नावाने आधीपासूनच स्टॅन्ड आहे. मागील वर्षी भारताचे सर्वकालीन महान फलंदाज सुनील गावसकर यांच्या नावाने कॉर्पोरेट बॉक्स येथे उभारण्यात आला होता. तसेच, माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या नावाने देखील वानखेडे स्टेडियमवर स्टॅन्ड आहे.

(Sachin Tendulkar Life Size Statue Unveil At Wankhede Stadium By Mumbai Cricket Association On His 50th Birthday)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंदोर कसोटीत विराट करणार खास क्लबमध्ये एन्ट्री! यापूर्वी भारताकडून फक्त द्रविडच मानकरी 
इंदोर नव्हेतर थेट अहमदाबाद कसोटीचा प्लॅन करतोय रोहित! WTC फायनलबाबत म्हणाला, “तयारी आता…” 


Next Post
Photo Courtesy: Twitter/ ICC

केवळ 'त्या' गोलंदाजाच्या रागामुळे भारत जिंकलेला लॉर्ड्स कसोटी! माजी प्रशिक्षकांनी केला खुलासा

Photo Courtesy: Twitter

याला म्हणतात कॉन्फिडन्स! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीऐवजी WTC फायनलचा विचार करतोय रोहित

Jasprit Bumrah

बुमराहचे पुनरागमन सप्टेंबरपर्यंत लांबणार! कारकीर्दीविषयी आता बीसीसीआय घेणार कठोर निर्णय

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143