---Advertisement---

३० हजार धावा केलेला खेळाडूही झाला होता सुशांतच्या फलंदाजीचा दिवाना

---Advertisement---

मुंबई । लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंह राजपूतने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईमधील राहत्या घरी त्याने हे टोकाचे पाऊल उचलून आपली जीवनयात्रा संपवली आहे. अद्याप त्याच्या आत्महत्येचे खरे कारण स्पष्ट झाले नसले तरी नैराश्याच्या भरात त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

बॉलिवूडमध्ये करिअर करणाऱ्या सुशांतचे क्रिकेटवर खूप प्रेम होते. एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात त्याने धोनीची भूमिका केली होती. सुशांतच्या आत्महत्येनंतर या चित्रपटाविषयी काही आठवणी समोर येत आहेत.

या चित्रपटात धोनीसारखी भूमिका व्हावी यासाठी माजी यष्टीरक्षक किरण मोरे यांनी सुशांतला मार्गदर्शन केले होते. इंडियन एक्स्प्रेस ने दिलेल्या माहितीनुसार, “सुशांतने मोरे यांच्याकडून बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये मार्गदर्शन घेत होता. त्यावेळी सचिन तेंडुलकरने आपला मुलगा अर्जुन याला घेऊन मैदानावर आला होता. सुशांतची फलंदाजी पाहून सचिन देखील त्याच्या फलंदाजीचा फॅन झाला होता.”

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---