---Advertisement---

खुद्द सचिनही झाला ‘जायंट किलर’ नामिबियाचा फॅन; कौतुकासाठी वापरला हा फेमस डायलॉग

On: रविवार, ऑक्टोबर 16, 2022 2:42 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित केल्या गेलेल्या टी20 विश्वचषकाचा (2022 T20 World Cup) रविवारी (16 ऑक्टोबर) शुभारंभ झाला. पात्रता फेरीने सुरू झालेल्या या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सर्वांना एक अपेक्षित निकाल पाहायला मिळाला. कोणीही विजयाची पसंती न दिलेल्या नामिबिया संघाने महिनाभरापूर्वी आशिया चषक जिंकलेल्या श्रीलंका (NAMvsL) संघाला 55 धावांनी पराभूत केले. त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होताना दिसतेय. चाहते व समीक्षक सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे अभिनंदन करत आहेत. त्याचवेळी भारताचा सर्वकालीन महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर देखील नामिबिया संघाचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. (Sachin Tendulkar Praised Namibia After Win Against Srilanka)

नामिबिया संघाने सर्वांच्या अंदाजा विरोधात जात श्रीलंकेला 55 धावांनी पाणी पाजले.‌ मागील वर्षी देखील या संघाने मुख्य फेरीपर्यंतचा प्रवास केला होता. त्यांच्या श्रीलंकेविरुद्धच्या कामगिरीनंतर अनेकांनी त्यांचे कौतुक केले. स्वतः सचिन तेंडुलकरने हा सामना संपल्यानंतर लगेचच ट्विट करत त्यांना शाबासकी दिली. सचिनने लिहिले,

‘नामिबियाने आज संपूर्ण क्रिकेटजगताला सांगितले आहे, नाम याद रखना’

 

सचिनने या ट्विटमध्ये नामिबियाचा झेंडा व टाळ्या वाजवण्याची इमोजी देखील टाकली आहे.

या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, श्रीलंकेने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजाने चांगली कामगिरी करत नामिबियाच्या प्रमुख फलंदाजांना लवकर बाद करण्यात यश मिळवले. मात्र, अष्टपैलू जान फ्रायलिंकने 44 व आठव्या क्रमांकावरील जेजे स्मीटने 16 चेंडूवर 31 धावा करत संघाला 163 पर्यंत मजल मारून दिली. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ अक्षरशः गडबडला. कर्णधार दसून शनाका 29 व भानुका राजपक्षे 20 यांच्या व्यतिरिक्त कोणीही संघर्ष करू शकले नाही. त्यामुळे त्यांचा डाव 108 धावांवर संपुष्टात आला. 44 धावा व 2 बळी मिळवणारा जान फ्रायलिंक सामनावीर ठरला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

T20WC: पहिल्याच सामन्यात ‘आशिया चॅम्पियन’ ची पोलखोल, नामिबियाचा श्रीलंकेवर मोठा विजय
टी20 विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात नामिबियाचा कहर, श्रीलंकेला दिले 164 धावांचे टारगेट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---