रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध झालेल्या आयपीएल २०२२च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सने ७ विकेट्सने विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला. सलामीवीर जोस बटलरच्या झंझावाती शतकी खेळीबरोबरच वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा आणि ओबेद मॅकॉय यांच्या किफायतशीर गोलंदाजीचाही संघाच्या विजयाच महत्त्वाचा वाटा राहिला आहे.
प्रसिद्ध (Prasidh Krishna) आणि मॅकॉय (Obed McCoy) यांच्या गोलंदाजीचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) याने कौतुक केले आहे. या दोघांनी बेंगलोरच्या फलंदाजांवरील दबाव कमी होऊ दिला नाही. याच कारणामुळे बेंगलोरचा संघ २० षटकात १५७ धावाच करू शकला असल्याचे मत सचिनने मांडले आहे.
दोन्ही गोलंदाजांचे प्रदर्शन शानदार राहिले
या सामन्यात राजस्थानकडून वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याने ४ षटके फेकताना फक्त २२ धावा देत ३ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. त्याने सलामीवीर विराट कोहली आणि जबरदस्त फॉर्मात असलेल्या दिनेश कार्तिकला स्वस्तात बाद केले. तसेच वानिंदू हसरंगालाही शून्य धावेवर त्रिफळाचीत केले. तर मॅकॉयने ४ षटके फेकताना २३ धावांमध्ये ३ विकेट्स घेतल्या. त्याने बेंगलोरचा कर्णधार फाफ डू प्लेसिस, महिवाल लोमरोर आणि हर्षल पटेलला पव्हेलियनला पाठवले.
१५७ धावा अजिबात चांगले लक्ष्य नव्हते
वेगवान गोलंदाजांच्या या जोडीचे कौतुक करताना सचिनने (Sachin Tendulkar Praised Rajasthan Bowlers) आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हटले की, “प्रसिद्धसोबत मॅकॉयही राजस्थानचा प्रमुख गोलंदाज आहे. दोन्ही गोलंदाजांनी बेंगलोरवर दबाव बनवून ठेवला. प्रसिद्धने कार्तिकला बाद केले, जो खूप चांगल्या स्ट्राईक रेटसह खालच्या फळीत दमदार फलंदाजी करत होता. त्यानंतर हसरंगाला शानदार चेंडू टाकत पव्हेलियनला पाठवले. या खेळपट्टीवर १५७ ही धावसंख्या अजिबात चांगली नव्हती.”
शानदार चेंडूवर मिळवली विकेट
सचिनने प्रसिद्धने ज्या चेंडूवर विराटची विकेट घेतली, त्या चेंडूला शानदार चेंडू संबोधले आहे. तो म्हणाला की, वेगावान गोलंदाज प्रसिद्धने बेंगलोरच्या सलामीवीराला अस्थिर करण्यासाठी चेंडूला दोन्ही बाजूंनी फिरवले.
सचिन म्हणाला की, “जेव्हा चेंडू एका बाजूला फिरत असतो, तेव्हा चेंडूला सोडणे सोपे असते. त्यातील एक चेंडू विराटच्या मांडीला लागला होता. अशावेळी फलंदाज विचारात पडतो की, मी हा चेंडू सोडू शकत नाही. प्रसिद्धचा विराटची विकेट घेणारा फॉलो-अप चेंडू खूप भारी होता.”
महास्पोर्ट्सचा वॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘विराट अन् अश्विन चांगले पंच बनू शकतात’, असे का म्हणाले ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज अंपायर?
पंधरा वर्षांखालील फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत ओंकार शिंदे व सोहम कुंभार यांची ‘सुवर्ण’ कामगिरी
मुरहारीने साकारला युपीएसएचा विजय; परशुरामियन्सचा विजयासाठी संघर्ष