रस्ते सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी सुरू झालेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचा दुसरा हंगाम शनिवारी (1 ऑक्टोबर) समाप्त झाला. सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वातील इंडिया लिजेंड्स संघाने श्रीलंका लिजेंड्सचा 33 धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा विजेतेपद आपल्या नावे केले. सलामीवीर नमन ओझा यांनी झळकावलेले शतक इंडिया लिजेंड्सच्या विजयात महत्वपूर्ण ठरले. त्याने शतक झळकावल्यानंतर अभिवादन स्वीकारण्यासाठी जेव्हा ड्रेसिंग रूमकडे पाहून बॅट उंचावली तेव्हा कर्णधार सचिन तेंडुलकरने दिलेली प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सलामीवीर नमन ओझाने इंडिया लिजेंड्सच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 71 चेंडूत 15 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 108 धावांची खेळी केली. शतक ठोकल्यानंतर त्याने ड्रेसिंग रूमकडे पाहत सर्वांचे अभिवादन स्वीकारले. त्यावेळचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ओझाच्या शतकावर सचिन तेंडुलकर एक विलक्षण प्रतिक्रिया देताना दिसतोय.
#NamanOjha completes his century with a fabulous six😍
Keep watching #RoadSafetyWorldSeries, live now only on #ColorsCineplex, @justvoot, @CCSuperhits and @Sports18.#IndiaLegends #SriLankaLegends #RSWS2022 pic.twitter.com/RQCEdCRsMO
— Colors Cineplex (@Colors_Cineplex) October 1, 2022
नमनने 19 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारून आपले शतक पूर्ण केले. स्पर्धेतील आपले पहिले शतक पूर्ण केल्यानंतर सलामीवीराने भारतीय ड्रेसिंग रुमकडे पाहून अभिवादनाचा स्वीकार केला. कर्णधार सचिन तेंडुलकरसह प्रत्येक खेळाडूने उभे राहून त्याचे कौतुक केले. त्याचवेळी सचिनने त्याला शेवटपर्यंत खेळण्याचा सल्ला दिला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
इंडिया लिजेंड्सने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना नमन ओझाच्या नाबाद 108, विनय कुमारच्या 36 आणि युवराज सिंगच्या 19 धावांच्या जोरावर 195 धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर श्रीलंकेच्या नावाने तितका वेग घेतला नाही. प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर इशान जयरत्नेने वेगवान अर्धशतक झळकावले मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. विनय कुमारने तीन तर अभिमन्यू मिथूनने 2 बळी मिळवत श्रीलंकेचा डाव 162 धावांवर गुंडाळला. सामनावीर पुरस्कार तर मालिकावीर पुरस्कार तिलकरत्ने दिलशान याला देण्यात आला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सलग दुसऱ्यांदा इंडिया लिंजेड्स बनला रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचा चॅम्पियन, फायनलमध्ये श्रीलंकेचा दारून पराभव
दिप्ती शर्माच्या धावबाद प्रकरणामुळे पेटले ‘ट्वीटर वॉर’, हर्षा भोगलेंच्या ट्वीटला बेन स्टोक्सकडून प्रत्युत्तर