दक्षिण आफ्रिकेचे माजी दिवंगत राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांना 100व्या जन्मदिवसानिमित्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत.
आज मंडेला यांचा 100वा जन्मदिवस आहे. दक्षिण आफ्रिकतील वर्णभेद याचे कट्टर विरोधक असलेले मंडेला हे 1994-1999 यादरम्यान दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती होते.
मंडेला यांनी वर्णभेद या संबधी सरकारविरोधात चळवळही केली होती. यामुळे त्यांना 27 वर्षे कारावासही भोगावा लागला.
भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज सचिन तेंडूलकर हा मंडेला यांना एकदा भेटला होता. मंडेला यांचा आज 100वा जन्मदिवस असल्याने त्याने त्यावेळचा फोटो ट्विट केला आहे.
यात त्याने, आज नेल्सन मंडेलांची त्यांच्या 100व्या वाढदिवसादिवशी आठवण आली. मी खूप भाग्यवान आहे की मी त्यांना भेटलो, त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे, असे त्यांने फोटोसह पोस्ट केले आहे.
Remembering @NelsonMandela on his 100th birthday. I was extremely fortunate enough to have met him early on in my life. So much to learn, so much to get inspired from. #Madiba100 pic.twitter.com/xMAEDdZhMN
— Sachin Tendulkar (@sachin_rt) July 18, 2018
दक्षिण आफ्रिकेतून वर्णभेदाचा पूर्णपणे नाश करण्यात मंडेला यांचे खूप मोठे योगदान आहे. तसेच त्यांना लोक ‘मडिबा’ किंवा ‘देशाचे पिता’ असेही म्हणतात.
मंडेला यांचे भारताबरोबर चांगले संबंध होते. तसेच त्यांना भारत सरकारने सर्वोच्च असा 1990चा भारतरत्न पुरस्कार दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–विरेंद्र सेहवागने दिला टीम इंडियाला आधार, ट्विट करुन जिंकली करोडो चाहत्यांची मने
–तब्बल नऊ एकदिवसीय मालिकेनंतर भारतीय संघावर आली ही वेळ