भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याने २४ वर्ष भारतीय संघासाठी मोलाचे योगदान दिले आहे. या कालावधीत त्याने अनेक मोठमोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा प्रत्येक क्रिकेटपटू मैदानात जाण्यापूर्वी दबावात असतो. मैदानात शांत आणि संयमी दिसून येणारा मास्टर ब्लास्टर देखील मैदानात उतरण्यापूर्वी दबावात असायचा. याचा खुलासा त्याने एका मुलाखतीत केला आहे.
सचिन तेंडुलकरच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतक झळकावण्याचा विक्रम आहे. यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रम देखील सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. त्याने २०१३ साली क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातून निवृत्ती जाहीर केली होती. परंतु आता त्याने एक धक्कादायक खुलासा करत म्हटले आहे की, प्रत्येक क्रिकेट सामन्यापूर्वी त्याला झोपच यायची नाही.
सचिनने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीची जास्त काळजी घेता तेव्हा तुम्ही त्या गोष्टीबद्दल अस्वस्थ होत असता. माझ्यासोबत असे व्हायचे कारण माझे क्रिकेटवर खूप प्रेम आहे. मी जेव्हा जेव्हा मैदानावर जायचो ,तेव्हा मी चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असायचो. मी तर असे म्हणेल की, माझ्या कारकिर्दीतील सुरुवातीच्या १२ वर्षांच्या काळात मला नीट झोप देखील येत नव्हती.”
मी स्वीकार केलं तेव्हा सर्व सोपं झालं
तसेच सचिनने पुढे म्हटले की, “मी नेहमी हाच विचार करायचो की, मी त्या गोलंदाजाचा सामना कसा करेल? तो गोलंदाज कशी गोलंदाजी करेल? माझ्याकडे त्या गोलंदाजाचा सामना करण्यासाठी काय पर्याय उपलब्ध असतील? हाच विचार करण्यामुळे मला झोप यायची नाही. मला या समस्येतून मार्ग काढता आला नाही तर, मी हे सर्व स्वीकार करायला सुरुवात केली होती. मी स्वतःची समजूत काढायचो की, सामना सुरू होण्यापूर्वी माझे शरीर स्वतःला अशाप्रकारे तयार करत असते. हे सर्व ठीक होते.”(Sachin Tendulkar reveals that ,he wasn’t able to sleep properly in his cricket career)
“मी या गोष्टींचा स्वीकार केला होता आणि स्वतःची समजूत काढली होती की, मी १२:३० किंवा १ वाजेपर्यंत जागा राहिलो, टी. व्ही पाहिली, गाणी ऐकली किंवा दुसरी काही गोष्ट केली याचा माझ्यावर काहीच फरक पडत नाही. कुठलीही गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे. मी जितक्या जास्त गोष्टी समजत गेलो, तितक्या त्या गोष्टी माझ्यासाठी सोप्या झाल्या होत्या. मी असे म्हणणार नाही की, ते माझ्यासाठी परिपूर्ण होते. पण होय मला समजले होते की, माझ्यासोबत असे होणे सामान्य आहे. शेवटच्या सामन्यापर्यंत हे माझ्या बाबतीत घडले होते.” असे सचिनने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या-
ओहो! केएल राहुलच्या झुंजार शतकाचे प्रेयसी अथियाकडून कौतुक, व्हिडिओ करत लिहिले…
‘नातं पक्कचं समजायच म्हणजे’! राहुलच्या शतकाने सुनिल शेट्टी इंप्रेस, अशी प्रतिक्रिया देत वेधले लक्ष