मुंबई । महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या मते २००६-२००७ हा काळ भारतीय क्रिकेटसाठीचा सर्वात खडतर काळ होता. हा काळ सर्वात निराशेचा असल्याचेही मत सचिनने व्यक्त केले आहे.
सचिन म्हणतो, “मला वाटतं २००६-०७ मध्ये भारतीय क्रिकेट खूपच बिकट परिस्थितीत होता. आम्ही २००७ च्या विश्वचषक स्पर्धेचा सुपर ८ चा टप्पादेखील पार करू शकलो नाही परंतु आम्ही नव्याने सुरुवात केली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.”
“त्यानंतर आम्ही संघात खूप बदल केले आणि आम्ही ठरवलं की आमचं ध्येय काय आहे आणि एकदा का आम्ही ते ठरवलं की आम्ही ते करतोच.” सचिन पुढे म्हणाला.
२००७ च्या विश्वचषक स्पर्धेत राहुल द्रविडच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ बांगलादेश आणि श्रीलंका यांच्या विरुद्ध पराभूत झाला होता.
“आम्हाला बऱ्याच गोष्टी बदलाव्या लागल्यात, ते योग्य होत की नाही ते मला माहित नाही. यातील कोणतीतच गोष्ट एका रात्रीत झाली नाही. आम्हाला वाट पाहावी लागली. विश्वचषकाची सुंदर ट्रॉफी जिंकण्यासाठी मला २१ वर्ष वाट बघावी लागली, ” असे सचिन म्हणाला.