आयपीएल २०२२ (IPL 2022) स्पर्धा मार्च महिन्याच्या शेवटी खेळवली जाणार आहे. तत्पुर्वी आयपीएलच्या १५ व्या हंगामाचा मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारीला बॅंगलोर येथे पार पडला. या लिलावात अनेक दिग्गज अनसोल्ड राहिले तर ११ खेळाडूंवर १० कोटींहून अधिक बोली लागली. या लिलावात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडूलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडूलकरवर(Arjun Tendulkar) ३० लाखांची बोली लावत त्याला खरेदी केले आहे. यानंतर सचिन तेंडूलकरने मोठे व्यक्तव्य केले आहे.
अर्जुन तेंडुलकर भारतीय संघाकडून १९ वर्षाखालील क्रिकेटमध्ये खेळला आहे. नुकतेच मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखल्या जाणार्या सचिन तेंडुलकरने खुलासा केला आहे की, अर्जुनने कोणत्याही दबावाशिवाय खेळाच्या प्रेमात पडावे अशी त्याची इच्छा असल्याने तो आपल्या मुलाला खेळताना पाहत नाही.
क्रिकेट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारा सचिन म्हणाला की तो काही सामन्यांमध्ये अर्जुनला न सांगताच त्याचे सामने पाहायला गेला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन म्हणाला की, “जेव्हा आई-वडिल आपल्या मुलांना खेळताना पाहत असतात, तेव्हा मुले दबावात येतात. या कारणामुळे मी अर्जुनचे सामने पाहायला जात नाही. मला वाटते की त्याला खेळताना पूर्णपणे स्वातंत्र्य मिळावे. त्याने क्रिकेटवर प्रेम करावे आणि त्याला जे काही करायचे आहे त्याच्यावर त्याचे लक्ष केंद्रीत व्हावे. याचमुळे मी त्याचा खेळ पाहायला जात नाही.”
गोलंदाज आणि फलंदाज म्हणून अर्जुन तेंडुलकरने गेल्या वर्षी हरियाणाविरुद्ध सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईकडून पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने तीन षटकात ३४ धावा देत एक विकेट घेतली. आयपीएल २०२१ मध्ये ही मुंबई इंडीयन्सने अर्जुनला खरेदी केले होते. त्या हंगामात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मुंबई इंडीयन्सने मागच्या हंगामात अर्जुन तेंडुलकरटा नेट गोलंदाज म्हणून उपयोग केला होता. आता २०२२ च्या आयपीएलमध्ये कर्णधाार रोहित शर्मा अर्जुनला खेळण्याची संधी देतो की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रेकॉर्ड अलर्ट! प्रथम श्रेणी पदार्पणात बिहारच्या क्रिकेटरचं त्रिशतक, केला एकच नंबर विश्वविक्रम
उपांत्य फेरीचे स्वप्न घेऊन मोहन बागान मैदानावर उतरणार; केरला ब्लास्टर्सला कडवी टक्कर देणार
“तेव्हा धोनी पाठीवर थाप मारत म्हणालेला आजचा दिवस तुझा नव्हता”