भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर (New Zealand Tour) आहे. या दौऱ्यात भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध 5 आंतरराष्ट्रीय टी20 सामने, 3 वनडे सामने आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्यापूर्वी भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar) भारतीय संघाची प्रशंसा केली आहे.
“आपल्याकडे वेगवान आणि फिरकीपटू गोलंदाज आहेत. मला असे वाटते की आपल्याकडे न्यूझीलंडमध्ये स्पर्धा करण्याची पूर्ण क्षमता आहे,” असे सचिन भारतीय संघाची प्रशंसा करताना म्हणाला.
“वेलिंग्टनमध्ये (Wellington) मी खेळलो आहे. जर तुम्ही हवेच्या दिशेने किंवा हवेच्या विरुद्ध दिशेने गोलंदाजी करत असाल तर याचा खूप फरक पडतो. फलंदाजाला या गोष्टीपासून सावध राहिले पाहिजे की गोलंदाजावर कोणत्या क्षणी आक्रमण करायचे आहे. हे सर्वात महत्त्वपूर्ण आहे,” असेही सचिन गोलंदाजीबद्दल म्हणाला.
46 वर्षीय सचिनने सांगितले की, मला असे वाटते की फिरकीपटूंनी हवेच्या विरुद्ध दिशेने गोलंदाजी केली पाहिजे. “हवेच्या विरुद्ध दिशेने गोलंदाजी करणाऱ्या वेगवान गोलंदाजांनी हुशारीने काम केले पाहिजे. जर हवेचा वेग जास्त असेल तर मी म्हणेल की त्याच्या विरुद्ध बाजूने फिरकीपटूंनी गोलंदाजी करावी. तसेच वेगवान गोलंदाजांनी हवेच्या दिशेने गोलंदाजी करावी,” असे गोलंदाजीबद्दल आपले मत व्यक्त करताना सचिन म्हणाला.
“वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये सामन्याची सुरुवात करणे आव्हानात्मक असेल. मला वाटते की रोहितने न्यूझीलंजमध्ये वनडे सामन्यात सलामीला फलंदाजी केली आहे. तसेच तो अनेकवेळा येथे खेळला आहे. त्याला तेथील सर्व परिस्थितीबद्दल माहिती आहे. परंतु कसोटी क्रिकेटचे आपले वेगळेच आव्हान असते,” असेही सचिन यावेळी म्हणाला.
न्यूझीलंडच्या खेळपट्टीबद्दल बोलताना सचिन म्हणाला की, न्यूझीलंडच्या खेळपट्ट्यांचा स्वभाव खूप बदलला आहे. तसेच या खेळपट्ट्यांवर फलंदाजी करण्याची क्षमता भारताकडे आहे. जेणेकरून भारत न्यूझीलंडसमोर समस्या निर्माण होऊ शकते.
सचिनने 1990-2009 पर्यंत 5 वेळा न्यूझीलंडचा दौरा केला आहे.
रोहितचे पुढील दोन महिने हा गोलंदाज करु शकतो खराबhttps://t.co/WjhZZq1HjF
— Maha Sports (@Maha_Sports) January 22, 2020
एकेवेळी फिटनेसवरुन प्रश्न उपस्थित केलेल्या खेळाडूने त्रिशतकी खेळीने विराटला दिले जोरदार उत्तर
वाचा👉https://t.co/bYWoEHSaoc👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #RanjiTrophy— Maha Sports (@Maha_Sports) January 22, 2020