भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने शनिवारी (१५ ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यानंतर आता त्याच्यासोबत खेळलेले अनेक दिग्गज खेळाडूंनी धोनीबद्दल अनेक रंजक खुलासे केले आहेत. भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही धोनीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
तो म्हणाला की, त्याने स्लिपमध्ये उभे राहून धोनीमध्ये लपलेल्या कर्णधाराचे गुण ओळखले होते. सचिनला २००७ मध्येच वाटले होते की धोनीमध्ये नेतृत्व करण्याचे कसब आहे आणि त्यांने बीसीसीआयला धोनीला कर्णधार बनवण्याबद्दल म्हटले होते. सचिन, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड या खेळाडूंनी त्यावर्षी पहिल्या आयसीसी टी२० विश्वचषकात ज्यूनियर खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर बीसीसीआयने त्यावेळी सचिनला आपली आवड सांगण्यास म्हटले होते.
सचिनने अशाप्रकारे शोधला धोनीमधील कर्णधार
सचिनने नुकतीच निवृत्ती घेतलेला माजी कर्णधार धोनीबाबत पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, “मी विस्तृतपणे सांगणार नाही की, हे कसे झाले होते. परंतु जेव्हा मला बीसीसीआयच्या अव्वल अधिकाऱ्यांनी विचारले, तेव्हा मी सांगितले की मी काय विचार करतो.”
तो म्हणाला, “मी म्हटले होते की मी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार नाही. कारण त्यावेळी मी दुखापतींनी ग्रस्त होतो. परंतु त्यावेळी मी स्लिप कॉर्डनमध्ये क्षेत्ररक्षण करत होतो आणि धोनीशी चर्चा करत असायचो. त्यावेळी मला समजले की तो काय विचार करत आहे. क्षेत्ररक्षण कसे असायला पाहिजे आणि विविध गोष्टींवर मी चर्चा करायचो.”
“मी धोनीची सामन्यातील परिस्थितींचे आकलन करण्याची क्षमता पाहिली आणि या निर्णयावर पोहोचलो की त्याच्याकडे क्रिकेटचे चांगले ज्ञान आहे. त्यामुळे मी बोर्डाला मला काय वाटते ते सांगितले की, धोनीला पुढचा कर्णधार बनविले गेले पाहिजे,” असेही सचिन पुढे म्हणाला.
सचिन म्हणाला की, तो धोनीच्या प्रत्येकाला आपल्या निर्णयासाठी मनवण्याच्या क्षमतेने प्रभावित होता. तो म्हणाला, “मी जो काही विचार करत आहे आणि त्याचा जो विचार होता, तो खूप मिळता जुळता होता. जर मी तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी मनवले, तर आमचे मत एकसारखे होईल. आम्ही दोघे एकप्रकारे विचार करत होतो आणि त्यामुळे मी त्याचे नाव सुचविले.”
धोनी आपल्यापेक्षा सीनियर खेळाडूंचा कर्णधार बनला होता
धोनीला २००८ मध्ये त्यावेळी कसोटी कर्णधारपद सोपविण्यात आले होते, ज्यावेळी भारतीय संघात सचिन, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग आणि झहीर खान यांसारखे सीनियर खेळाडू सामील होते. सचिनला जेव्हा विचारले की धोनी संघातील सीनियर खेळाडूंसोबत कसा खेळत असायचा. त्यावर सचिन म्हणाला, “मी केवळ माझ्याबाबत बोलू शकतो की, माझी कर्णधार बनण्याची काहीच इच्छा नव्हती. मी तुम्हाला हे सांगू शकतो की, मला कर्णधार बनायचे नव्हते तसेच मला संघासाठी प्रत्येक सामना जिंकायचा होता.”
तो म्हणाला, “कर्णधार कोणीही असो, मला नेहमीच आपले पूर्ण योगदान द्यायचे होते. मला जे काही चांगले वाटत होते मी कर्णधारापुढे ते ठेवायचो. निर्णय हा कर्णधाराचा होता. परंतु त्याच्यावरील कामाचा ताण कमी करणे हे आमचे कर्तव्य असते.”
“जेव्हा २००८ मध्ये धोनी कर्णधार बनला, तेव्हा मी जवळपास १९ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घालवली होती. इतकी वर्षे खेळल्यानंतर मला माझी जबाबदारी माहिती होती,” असेही तो पुढे म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या-
-‘कोण माझी पहिली कार मला परत आणून देईल का?’ मास्टर ब्लास्टर करतोय विनवणी
-२०११ विश्वचषकातील धोनीचा विजयी षटकार ज्या ठिकाणी पडला होता, ती सीट होणार धोनीच्या नावावर?
-सीपीएलच्या पहिल्याच सामन्यात सुनील नारायणचा जलवा; अष्टपैलू कामगिरीने मिळवून दिला संघाला विजय
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएलच्या फायनलमध्ये ‘या’ धडाकेबाज खेळाडूने ठोकलेत सर्वाधिक षटकार; धोनी आहे ‘या’ क्रमांकावर
-धोनी-रैनानंतर ‘हे’ ५ भारतीय खेळाडू देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटला करु शकतात अलविदा
-‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीचे ५ असे निर्णय, ज्याचा झाला टीम इंडियाला मोठा फायदा