कोरोना महामारीच्या सुट्टीत सध्या भारताचा दिग्गज खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर धमाल करताना दिसून येत आहे. या महान खेळाडूने समुद्रात पॅरासिलिंग करतानाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला. या व्हिडिओमध्ये सचिन खूप मजा-मस्तीच्या मूडमध्ये दिसून येतोय.
सचिनने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हम तो उड गए’. परंतु यामध्ये सचिन पॅरासिलिंग कुठे करत आहे, ते त्याने नाही सांगितले.
https://www.instagram.com/p/CIf10F1g06Z/?utm_source=ig_web_copy_link
चाहते म्हणाले ही कल्पना सारा तेंडुलकरची असेल
सचिनच्या व्हिडिओ खूप मजेदार प्रतिक्रिया येत आहेत. एका चाहत्याने लिहले की, ‘ही पूर्ण कल्पना सारा तेंडुलकरची असेल.’ त्यानंतर दुसरा चाहता म्हणाला की, ‘अगोदर गोलंदाजांना उडवले होते, आता स्वत: उडून गेला.’
सचिनने 2013 मध्ये घेतली निवृत्ती
सचिनने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 200 वा सामना खेळल्यानंतर निवृत्ती घेतली होती. 2011 च्या विश्वचषकात महत्वाची भूमिका बजावली होती. हे विजेतेपद भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला होता.
सचिन तेंडुलकर 100 शतके करणारा एकमेव खेळाडू आहे
सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके ठोकली आहे आणि अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू आहे.
त्याने 200 कसोटीत 15921 आणि 463 वनडेत 18426 धावा केल्या आहेत. त्याने एका आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यामध्ये 10 धावा केल्या आहेत. यासोबतच आयपीएलमध्ये 78 सामन्यात एका शतकासह 2334 धावा काढल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
VIDEO: ऑस्ट्रेलियाच्या नवोदित अष्टपैलूचा दणका; शतकी खेळीनंतर ‘पृथ्वी शॉ’ला केले सापळा रचून बाद
रडणाऱ्या मुलाला वडील दाखवत होते भारत- ऑस्ट्रेलिया सामना, पाहा गमतीशीर व्हिडिओ
रडणाऱ्या मुलाला वडील दाखवत होते भारत- ऑस्ट्रेलिया सामना, पाहा गमतीशीर व्हिडिओ
ट्रेंडिंग लेख-
टॉप ३: २०२० मध्ये वनडेत सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारे भारतीय शिलेदार; अव्वलस्थानी ‘हा’ खेळाडू
भारताकडून २०२० मध्ये वनडे सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारे ३ खेळाडू; पंड्या ‘या’ क्रमांकावर
आयपीएलमध्ये अवघ्या ६३ चेंडूत १२० धावा फटकावणारा पॉल वॉल्थटी आता आहे तरी कुठे?