---Advertisement---

‘महाराष्ट्र दिना’निमित्त ‘मास्टर ब्लास्टर’ने शेअर केली वडिलांची कविता, तुम्हालाही नक्कीच आवडेल

---Advertisement---

आज(१ मे) महाराष्ट्र दिन संपूर्ण राज्यात साजरा केला जात आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी शेकडो हुतात्म्यांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली होती. पण अखेर १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली. त्यामुळे या दिवशी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. तसेच आजच्याच दिवशी जगभरात कामगार दिन देखील साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचाही समावेश आहे.

सचिनने महाराष्ट्र दिनानिमित्त खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईतील ‘साहित्य सहवास’ सोसायटीमध्ये लहानाचा मोठा झालेल्या सचिनने महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा देताना त्याच्या वडीलांची ‘कुणीतरीची कथा’ ही कविता शेअर केली आहे. तसेच त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘आज महाराष्ट्र दिनानिमित्त माझ्या वडिलांची एक कविता सादर करत आहे. आपणा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!’

सचिनने त्याच्या कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम करत महाराष्ट्र राज्याचे नाव जगभरात पोहचवले आहे. तसेच त्याचे वडील रमेश तेंडुलकर मोठे साहित्यिक होते. त्यांनी अनेक काव्यरचना केल्या आहेत. तसेच ते उत्तम समीक्षकही होते.

सचिनची कारकिर्द –

सचिनने त्याच्या कारकिर्दीत अनेक मोठी यशाची शिखरे गाठली आहेत. त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २०० कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने ५३.७८ च्या सरासरीने ५१ शतकांसह १५९२१ धावा केल्या आहेत. तसेच त्याने कसोटीत ४६ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय ४६३ वनडे सामन्यात ४४.८३ च्या सरासरीने ४९ शतकांसह १८४२६ धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने १५४ विकेट्सही घेतल्या आहेत. याबरोबरच त्याने १ आंतरराष्ट्रीय टी२० सामनाही खेळलेला असून यात त्याने १० धावा केल्या असून १ विकेट घेतली आहे.

सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके केली असून हा टप्पा पार करणारा तो पहिला आणि एकमेव क्रिकेटपटू आहे. तसेच तो सर्वाधिक कसोटी सामने खेळणाराही खेळाडू असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाराही तो क्रिकेटपटू आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

मुंबईच्या शिलेदारांना जहीरने दिला विजयाचा मंत्र, पाहा व्हिडिओ

MI vs CSK : आयपीएल इतिहासातील पारंपरिक प्रतिस्पर्धी येणार आमनेसामने, पाहा दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

‘कॅप्टनकूल’च्या संगतीचीच कमाल म्हणायची! खराब कामगिरीमुळे कोहलीने हाकललं, आता धोनीच्या संघाचा बनलाय ‘मॅच विनर’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---