मुंबई । मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सचिन टेनिस खेळताना दिसून येत आहे. व्हिडिओ शेअर केल्यानंतर सचिन तेंडुलकरने महान टेनिस खेळाडू रॉजर फेडरर यांच्याकडून सल्ला मागितला आहे.
सचिन तेंडुलकर टेनिस आणि 20 वेळा ग्रॅण्ड स्लॅम विजेता रॉजर फेडररचा मोठा चाहता आहे. तो अनेकदा विम्बल्डनमध्ये फेडररचे सामने पाहण्यासाठी जायचा. 47 वर्षीय सचिनने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच सचिनने फोरहँडसाठी रॉजर फेडररकडून सल्ला मागितला आहे.
Hey @rogerfederer!
Any tips for my forehand? ????????@Wimbledon #FlashbackFriday #Wimbledon pic.twitter.com/bY4QETHRDx
— Sachin Tendulkar (@sachin_rt) July 3, 2020
सहा विश्वचषकात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करणार्या सचिन तेंडुलकरच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 51 शतके ठोकण्याचा विक्रम आहे तर वनडे क्रिकेटमध्ये 49 शतके ठोकली आहेत.
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. सचिन तेंडुलकर सध्या मुंबईत असून तो आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहे.
याच दरम्यान, या वर्षातला तिसरा ग्रँडस्लॅम विम्बल्डन देखील रद्द करण्यात आले आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच टेनिस स्पर्धा रद्द करण्यात आली आहे.