---Advertisement---

BIG BREAKING: अखेर 3 वर्षांनंतर सचिनच्या अर्जुनचे आयपीएल पदार्पण! केकेआरविरूद्ध मिळाली प्लेइंग 11 मध्ये संधी

On: रविवार, एप्रिल 16, 2023 3:22 PM
---Advertisement---

मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर रविवारी (16 एप्रिल) दुपारी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना खेळला गेला. नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वातील मुंबई संघाने नाणेफेक जिंकली. नाणेफेक जिंकून सूर्यकुमारने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर या सामन्यातून आयपीएल पदार्पण करत आहे.

आपल्या दुसऱ्या विजयाच्या शोधात असलेल्या मुंबई इंडियन्स ने या सामन्यात काही महत्त्वपूर्ण बदल केले. नियमित कर्णधार रोहित शर्मा तब्येत बरी नसल्याने या सामन्यात उतरला नाही. त्याच्याजागी अनुभवी सूर्यकुमार यादव याने मुंबईचे नेतृत्व केले. या सामन्यात मुंबईसाठी सचिन तेंडुलकरचा पुत्र अर्जुन तेंडुलकर याने पदार्पण केले. त्यासोबतच दक्षिण आफ्रिकेचा युवा वेगवान गोलंदाज डुआन जेन्सन याला देखील आयपीएल पदार्पणाची संधी मिळाली.

अर्जुन हा डाव्या हाताचा मध्यमगती वेगवान गोलंदाज तसेच आक्रमक फटकेबाज म्हणून ओळखला जातो. अर्जुनला 2021 मध्ये मुंबईने सुरुवातीला 20 लाख रुपयांच्या किमतीत आपल्या संघात सामील करून घेतले होते. त्यानंतर ‌‌‌‌2022 आयपीएल लिलावात पुन्हा मुंबईने त्याच्यावर ‌‌40 लाखांची बोली लावली. मात्र, या दोन्ही हंगामात त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. या हंगामातील पहिल्या तीन सामन्यात देखील तो बाकावर राहिला. मात्र, घरच्या मैदानावर त्याला अखेर पदार्पण करता आले.

अर्जुन हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोव्याचे प्रतिनिधित्व करतो. मुंबईसाठी वयोगट क्रिकेट खेळल्यानंतर त्याने गोव्यासाठी प्रथमश्रेणी, लिस्ट एक व टी20 पदार्पण केले. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील चांगल्या कामगिरीनंतर त्याला यावर्षी आयपीएल पदार्पण करण्याची चांगली संधी निर्माण झालेली.

(Sachin Tendulkar Son Arjun Tendulkar Makes IPL Debute For Mumbai Indians)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---