जगभरात रस्ते सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी सुरू झालेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचा दुसरा हंगाम 10 सप्टेंबरपासून भारतात सुरू होत आहे. स्पर्धेच्या या दुसऱ्या हंगामात भारतासह 8 संघ सहभागी होतील. या स्पर्धेत खेळणाऱ्या इंडिया लिजेंड्सचा कर्णधार म्हणून भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची नियुक्ती केली गेली आहे. सलग दुसऱ्या हंगामात तो संघाचे नेतृत्व करेल. माजी क्रिकेटपटूंच्या असलेल्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सचिनने आता सरावाला सुरुवातही केली असून, त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
स्पर्धेची सुरुवात कानपूर येथे होणार आहे. इंडिया लिजेंड्स संघ दक्षिण आफ्रिका लिजेंड्सविरूद्ध आपल्या अभियानाची सुरुवात करेल. इंडिया लिजेंड्स संघात सचिनसह वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, सुरेश रैना, मोहम्मद कैफ पठाण बंधू यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे.
Sachin Tendulkar back in the nets. pic.twitter.com/jnvi0eYxyG
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 7, 2022
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजच्या (Road Safety World Series) मागील वर्षीच्या हंगामात सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या नेतृत्वातील इंडिया लिजेंड्स संघाने अंतिम सामन्यात श्रीलंका लिजेंड्स संघाला मात दिली होती. अंतिम सामना भारताने 14 धावांच्या अंतराने जिंकला होता.
#Kanpur-सचिन तेंदुलकर ने ग्रीन पार्क स्टेडियम में जमकर की प्रैक्टिस.@BCCI @RSWorldSeries@UPCACricket #UttarPradesh@sachin_rt #SachinTendulkar #कानपुर pic.twitter.com/gR3iGLiuia
— ASHISH YADAV (@AshishYadavknp) September 7, 2022
इंडिया लिजेंड्स संघ-
सचिन तेंडुलकर (कर्णधार), युवराज सिंग, युसूफ पठाण, सुरेश रैना, इरफान पठाण, हरभजन सिंग, नमन ओझा, प्रज्ञान ओझा, विनय कुमार, मुनाफ पटेल, एस बद्रीनाथ, मनप्रीत गोनी, राहुल शर्मा, राजेश पवार, अभिमन्यू मिथुन आणि स्टुअर्ट बिन्नी.