---Advertisement---

सचिन-गांगुलीच्या संघसहकाऱ्याला पोलिसांकडून अटक, रणजी ट्रॉफीतही केले आहे संघाचे नेतृत्व

On: बुधवार, जानेवारी 28, 2026 9:46 AM
---Advertisement---

भारताचा माजी क्रिकेटपटूला पोलिसांनी अटक केली आहे. त्या क्रिकेटपटूने नशेत असताना आपल्या कारने तीन वाहनांना धडक दिली. ही घटना मंगळवारी (२७ जानेवारी) घडली. तो क्रिकेटपटू भारताचे दिग्गज सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलींचा संघसहकारी राहिला आहे. त्याचे नाव जेकब मार्टिन असे आहे.

मार्टिनने दारूच्या नशेत असताना आपली कार चालवत रस्त्यावर उभ्या असलेल्या अन्य तीन वाहनांना धडक दिली.
पोलिसांनी घटनेनंतर काही कालावधीतच त्याला अटक केली. पोलिसांनी या घटनेची अधिक माहिती दिली. ते म्हणाले, ” मार्टिन रात्रीचे २.३० मिनिटांनी अकोटामधील पुनीत नगरच्या सोसायटीपाशी त्यांची लग्जरी एसयूव्ही चालवत होते. नशेत असल्याने त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि जवळच पार्क केलेल्या तीन गाड्यांना धडक दिली.”

अकोटाच्या पोलिसांनी त्यांना अटक केली. विशेष म्हणजे पोलिसांकडून अटक होण्याची ही त्यांची पहिलीच वेळ नाही. त्यांना पोलिसांनी २०११मध्येही मोठ्या गुन्ह्यात अटक केली होती. तसेच २०१८मध्येही त्यांचा कार अपघात झाला होता.
धडक बसलेल्या वाहनांच्या मालिकांनी मार्टिन विरोधात तक्रार दाखल केली आहे.

मार्टिनने भारतासाठी १० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तो १९९९ ते २००१च्या दरम्यान संघाचा भाग होता. त्याने १९९९मध्ये टोरंटोमध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. ते दहाही सामने वनडे प्रकाराचे होते. यामध्ये त्याने २२.५७च्या सरासरीने १५८ धावा केल्या होत्या. त्यामध्ये सर्वोच्च धावसंख्या पाकिस्तानविरुद्ध केली होती. २०००मध्ये पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात मार्टिनने ३९ धावा केल्या होत्या.

तसेच मार्टिनने स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली. त्याने वडोदरासाठी देशांतर्गत सामने खेळताना रणजी ट्रॉफीमध्ये संघाचे नेतृत्वही केले आहे. प्रथम श्रेणीच्या १३८ सामन्यात ९१९२ धावा केल्या. तसेच लिस्ट एच्या १०१ सामन्यात २९४८ धावा केल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---