भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार कसोटी सामन्याची बॉर्डर गावसकर मालिका संपन्न झाली. या मालिकेतील चौथा सामना ब्रिस्बेन येथील गाबा मैदानावर खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने भारतीय संघाला विजयासाठी 328 धावांचे लक्ष्य दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने 96.6 षटकांत 7 गडी गमावून 329 धावा केल्या. त्यामुळे भारताने भारतीय संघाने 3 गडी राखून विजय मिळवला. यामुळे भारतीय संघाचे महान खेळाडू सचिन तेंडुलकर यांनी भारतीय संघाचे खास शब्दात कौतुक केले आहे.
भारतीय संघाचा हा विजय अनेक कारणासाठी खास ठरला आहे. त्यापैकी एक म्हणजे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात दुसर्यांदा कसोटी मालिका जिंकली आहे. त्याचबरोबर भारतीय संघाने चौथ्या कसोटी सामना गाबा येथे जिंकला आहे. या मैदानावर भारताचे विजय मिळविण्याचे खूप वर्षापूर्वी पासूनचे स्वप्न होते. कारण या मैदानावर भारतीय संघाने पहिल्यांदाच विजय मिळवला आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या या ऐतिहासिक विजयानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी आपल्या खास शब्दात भारतीय संघाचे कौतुक केले आहे.
महान खेळाडू सचिन तेंडुलकर यांनी ट्विट करताना लिहले की, “ब्रिस्बेन कसोटीतील प्रत्येक सत्रात भारतीय संघाला एक नवीन हीरो मिळाला. मार बसल्यानंतर प्रत्येकवेळी आपण कणखरपणाने उभा राहिलो आणि आणखी चांगली कामगिरी करून दाखवली. निष्काळजी नव्हे तर निर्भीडपणे कसे खेळायचे याच्या कक्षा आपण आणखीन रुंदावल्या. आपण दुखापतीला आणि अनिश्चिततेला संयम आणि आत्मविश्वासाने प्रत्युत्तर दिले. त्याचबरोबर हा विजय ऐतिहासिक आहे. ”
EVERY SESSION WE DISCOVERED A NEW HERO.
Every time we got hit, we stayed put & stood taller. We pushed boundaries of belief to play fearless but not careless cricket. Injuries & uncertainties were countered with poise & confidence. One of the greatest series wins!
Congrats India. pic.twitter.com/ZtCChUURLV— Sachin Tendulkar (@sachin_rt) January 19, 2021
या अगोदर भारतीय संघाने कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघाला त्यांच्याच देशात कसोटी मालिकेत पराभूत केले होते. त्यांनंतर पुन्हा या कामगिरीची पुनरावृत्ती करताना भारतीय संघाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन संघाला त्यांच्याच देशात कसोटी मालिकेत पराभूत केले. विशेष म्हणजे जेव्हा जेव्हा भारतीय कसोटी संघाचे अजिंक्य रहाणेने नेतृत्व केले आहे, तेव्हा – तेव्हा भारतीय संघ अजिंक्य राहिला आहे. अजिंक्य रहाणेने त्याच्या नावाप्रमाणे भारतीय संघाला आपल्या नेतृत्वाखाली अजिंक्य राखण्याची खूप मोठी भूमिका पार पाडली.
भारतीय संघाने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाला ऍडलेडमध्ये झालेल्या, पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर भारतीय संघाचे दुसर्या सामन्यात अजिंक्य रहाणेने केले. हा सामना मेलबर्न येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला. त्यांनंतर सिडनीतील तिसरा अनिर्णित राहिला. त्याचबरोबर आता गाबा येथे चौथा कसोटी सामना खेळला गेला. ज्यामधे भारतीय संघाने 3 विकेट्स ऐतिहासिक विजय मिळवत मालिका आपल्या नावी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
विलक्षण योगायोग! बाप विराटच्या आणि आता लेकीच्या जन्मावेळीही घडलाय तोच इतिहास; जाणून घ्या
केवळ आजी-माजी क्रिकेटपटूंनीच नाही तर इंग्लंडच्या या फुटबॉलपटूकडूनही टीम इंडियाला मिळाल्या शुभेच्छा