---Advertisement---

भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर विराट कोहली खुश! ‘असे’ ट्विट करत केले अभिनंदन

On: मंगळवार, जानेवारी 19, 2021 7:15 PM
---Advertisement---

भारतीय संघाने ब्रिस्बेन कसोटीत अशक्यप्राय मानला गेलेला विजय मिळवत ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. तसेच या विजयासह मालिकेत २-१ अशा फरकाने विजय मिळवत सलग तिसऱ्यांदा बॉर्डर-गावसकर चषकावर आपले नाव कोरले. या मालिकेत अनेक अडथळ्यांचा सामना करत भारताने हा विजय मिळविला.

त्यामुळे त्यांचे आता सर्वत्र कौतुक होत आहे. यात आता भारताचा विद्यमान कर्णधार विराट कोहलीचाही समावेश झाला आहे. त्याने ट्विट करत भारतीय संघाचे अभिनंदन केले.

तो म्हणाला, “काय अप्रतिम विजय होता! व्वा! ज्यांनी ज्यांनी आमच्या क्षमतेवर एॅडलेडच्या सामन्यानंतर शंका घेतल्या त्यांनी त्यांनतरचा खेळ बघा. सुरेख कामगिरी! मात्र आज संघाने दाखवलेला दृढनिश्चय आणि हिंमत अतिशय कौतुकास्पद होती. संपूर्ण संघ व्यवस्थापन आणि खेळाडूंचे खूप खूप अभिनंदन. हा ऐतिहासिक विजय साजरा करा! खूप खूप अभिनंदन!”

दरम्यान विराट कोहलीबाबत बोलायचे झाल्यास या मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर तो पालकत्व रजेसाठी माघारी परतला होता. त्यामुळे उर्वरित तीन कसोटीत अजिंक्य रहाणेने भारताचे नेतृत्व केले. मात्र अशा परिस्थितीत अनेक आजी-माजी खेळाडूंनी कोहलीच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलिया भारताला व्हाईटवाॅश देईल, असेही भाकीत वर्तविले होते. मात्र या सगळ्या अंदाजांना धक्का देत युवा भारतीय संघाने ब्रिस्बेनमध्ये आज इतिहास घडवला.

महत्वाच्या बातम्या:

विलक्षण योगायोग! बाप विराटच्या आणि आता लेकीच्या जन्मावेळीही घडलाय तोच इतिहास; जाणून घ्या

ये नया भारत घर में घुस कर मारता है, भारताच्या मालिका विजयानंतर विरेंद्र सेहवागचं ट्विट तुफान व्हायरल

केवळ आजी-माजी क्रिकेटपटूंनीच नाही तर इंग्लंडच्या या फुटबॉलपटूकडूनही टीम इंडियाला मिळाल्या शुभेच्छा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---