‘१० जून २०१९’ हा तो दिवस आहे, ज्या दिवशी भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातून निवृत्ती घेतली होती. काल या गोष्टीला १ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने युवराजसोबतच्या पहिल्या भेटीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सचिनने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन ट्वीट करत या गोष्टीची माहिती दिली आहे.
सचिनने युवराजसोबतचा फोटो ट्विट करत लिहिले की, “तुला सेवानिवृत्त होऊन एक वर्ष पूर्ण झाले. तुझ्यासोबत जुळलेली माझी पहिली आठवण चेन्नई कॅम्पमध्ये होती. मी तुझी मदत नव्हतो करु शकत. पण, तू शरीराने खूप सशक्त आणि पाँईन्टवर खूप वेगवान होतास. मला तुझ्या षटकार मारण्याच्या क्षमतेविषयी बोलण्याची गरज नाही. हे स्पष्ट होते की, तू जगातील कोणत्याही मैदानावर चेंडूला सीमारेषेबाहेर पाठवू शकतोस.”
It’s been a year since You(Vi) retired..
My first memory of you was during the Chennai camp & I couldn’t help but notice that you were very athletic & deceptively quick at Point. I needn’t talk about your 6 hitting ability, it was evident you could clear any ground in the world. pic.twitter.com/QNpZEQ4vel
— Sachin Tendulkar (@sachin_rt) June 10, 2020
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या १९ वर्षांच्या कारकिर्दीत युवराज २००७ सालच्या टी२० विश्वचषक आणि २०११ सालच्या वनडे विश्वचषकातील विश्वविजेत्या भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग होता. शिवाय, २०११च्या विश्वचषकात तो मालिकावीर ठरला होता.
जून २०१७ला युवराजने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. युवराजने त्याच्या वनडे कारकिर्दीत ३०४ सामन्यात ३६.५५च्या सरासरीने ८७०१ धावा केल्या होत्या. तर, १११ विकेट्सही घेतल्या होत्या. तसेच, कसोटीत ४० सामन्यात ३३.९२च्या सरासरीने १९०० धावा केल्या होत्या आणि ३५ डावात गोलंदाजी करताना ९ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, टी२०त २८.०२च्या सरासरीने ११७७ धावा केल्या होत्या आणि २८ विकेट्स आपल्या नावावर केल्या होत्या.
ट्रेंडिंग घडामोडी-
तेव्हा विराट लालू प्रसाद यादवांच्या मुलाच्या नेतृत्त्वाखाली खेळत होता,…
गुड न्यूज- ऑगस्ट महिन्यात टीम इंडिया जाणार या देशाच्या दौऱ्यावर?
२३ हजार धावा व १६५८ झेल घेणारा खेळाडू झालाय पेंटर, रोज करतो…