जागतिक क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) क्रिकेट विश्वात आपला ठसा उमटवला. पण आता त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरही (Arjun Tendulkar) त्याच्या खेळामुळे चर्चेत राहतो. अर्जुनने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडू देखील पदार्पण केले आहे. 1999 मध्ये जन्मलेला अर्जुन (24 सप्टेंबर) रोजी 25 वर्षांचा झाला. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण अर्जुनने आतापर्यंत किती कमाई केली आहे, हे जाणून घेऊया.
अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) हा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. तो बऱ्यापैकी फलंदाजीही करतो. देशांतर्गत क्रिकेट स्तरावर अर्जुन गोव्यासाठी खेळताना दिसतो. तो मुंबईविरुद्धही आपल्या उत्कृष्ट कामगिरीने चर्चेत आला होता. मात्र, त्याला अद्याप भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. यासाठी अर्जुन देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप घाम गाळताना दिसत आहे. आयपीएलमध्ये, मुंबईने त्याला 20 लाख रुपयांच्या किमतीत आपल्या ताफ्यात सामील केले होते.
अर्जुन तेंडुलकरच्या (Arjun Tendulkar) एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले, तर त्याची एकूण संपत्ती 21 कोटी रुपये आहे. देशांतर्गत क्रिकेटमधून त्याने सर्वाधिक कमाई केली आहे. आयपीएलबद्दल बोलायचे झाले, तर अर्जुनने आयपीएल मधून आतापर्यंत फक्त 1 कोटी रुपये कमावले आहेत. आगामी आयपीएल हंगामापूर्वी देखील मेगा लिलाव होणार आहे. यावेळी अर्जुनला कोणता संघ किती पैशामध्ये खरेदी खरेदी करतो, हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs BAN: दुसऱ्या कसोटीत पडणार रेकाॅर्ड्सचा पाऊस? ‘हे’ दिग्गज रचणार इतिहास
“त्याला शांत करावे लागेल” बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीपूर्वी ऑस्ट्रेलिया दिग्गजाचे खळबळजनक वक्तव्य
दुसऱ्या कसोटीपूर्वी संघाला धक्का, वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर; या खेळाडूला मिळाले स्थान