सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन १९ वर्षांखालील मुंबई संघात पुढच्या आठवड्यात पदार्पण करणार आहे. पुढच्या आठवड्यात विनोद मंकड ट्रॉफी स्पर्धा सुरु होत आहे. या स्पर्धेसाठी अर्जुनची मुंबई संघात निवड झाली आहे.
राजेश पवारांच्या अध्यक्षतेखाली मुंबई क्रिकेट अससोसिएशन निवड समितीने १९ वर्षांखालील मुंबई संघाची निवड केली. या संघात अर्जुनसह १५ खेळाडूंची निवड झाली आहे. अग्नी चोप्राकडे पहिल्या दोन सामन्यांचे कर्णधापद सोपवलं आहे.
मुंबई संघाचे पहिले दोन सामने ९ ऑक्टोबरला बडोदा विरुद्ध तर १० ऑक्टोबरला सौराष्ट्राविरुद्ध मुंबईत होणार आहेत. मुंबई संघात अर्जुन तेंडुलकर बरोबरच अनेक खेळाडू पहिल्यांदाच १९ वर्षांखालील संघात खेळणार आहेत असे पवार म्हणाले
पवार अर्जुनच्या निवडी बद्दल सांगताना म्हणाले त्याने संघ निवड चाचणीत त्याच्या अष्टपैलू खेळाने त्यांना प्रभावित केले. ते म्हणाले “अर्जुन आमच्या संघातला मुख्य अष्टपैलू खेळाडू असेल. आम्ही नुकतेच बडोद्यात खेळलो त्यात त्याने चांगली गोलंदाजी केली. आणि आमच्या मुंबईतील सराव सामन्यात चांगली गोलंदाजी व फलंदाजी केली. मी त्याला संघातील अष्टपैलू गोलंदाज समजतो.”
अर्जुन २०१५-१६ च्या मोसमात १६ वर्षांखालील मुंबई संघात खेळला आहे. तसेच ‘बी’ डिव्हिजनच्या आत्ताच झालेल्या डॉ. एचडी कांगा क्रिकेट लीगमध्ये परळ क्रिकेट क्लब कडून खेळाला होता.
असा आहे १९ वर्षांखालील मुंबईचा संघ:
अग्नी चोप्रा (कर्णधार), ध्रुव ब्रीद (यष्टीरक्षक),तनुश कोटियन, अथर्व अंकोलेकर, करण शहा, सत्यालक्षा जैन, यशस्वी जैस्वाल, दिव्यांश सक्ससेना, अभिमानी वशिष्ठ, अर्जुन तेंडुलकर, सक्षम झा, सिल्वेस्टर डिसूझा, अंजदीप लाड, सागर छाबरिया, फरहान काझी.