---Advertisement---

कोरोनामुळे सचिन तेंडुलकरच्या हमशकलची गेली नोकरी, वाचा काय करत होता काम

On: शुक्रवार, जून 26, 2020 8:09 AM
---Advertisement---

मुंबई । कोरोना महामारीमुळे सर्वच क्षेत्र ठप्प झाली आहेत. अनेक व्यवसायांची घडी विस्कटली आहे. परिणामी कित्येक जणांना आपल्या नोकरीवर पाणी सोडावे लागले आहे. काम नसल्याने कुटुंबांवर उपासमारीची वेळ देखील आली आहे. दरम्यान, सचिन तेंडुलकरचा हमशकल बलवीर चंद यांना देखील या संकटातून जावे लागत आहे. 

बलबीर चंद हे कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. ते विक्रोळीमध्ये भाड्याच्या घरात राहतात. काही दिवसापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तसेच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला या कोरोना महामारीने घेरले होते. याच दरम्यान बलवीर यांची नोकरी देखील गेली. नोकरी गेल्याने ते मुंबई सोडून त्यांचे मूळगाव पंजाब या ठिकाणी गेले. नोकरी नसल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. 

बलवीर गोली वडा पाव फास्ट फूड चेनचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर होते. यावरच त्यांचे कुटुंब चालायचे. पण कंपनीने त्यांना कामावरून कमी केले आहे. परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर कंपनीने त्यांना पुन्हा कामावर घेण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती बलवीर चंद यांनी दिली आहे. 

बलबीर चंद हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना म्हणाले की, ” लॉक डाऊनमुळे माझ्या कंपनीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे कंपनीने माझ्यासह अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. नोकरी गेल्यामुळे विक्रोळी येथील घराचे भाडे देणे देखील मुश्किल झाले आहे. त्यामुळे मी माझी पत्नी आणि तीन मुलांसह मुंबईहून माझ्या मूळ गावी लुधियाना येथे आलो आहे. प्रवासात आम्ही खूप काळजी घेतली, पण रेल्वेमध्ये अनेक लोक याचे पालन करत नव्हते. सध्या प्रवास करणे सुरक्षित नसल्याचेही चंद यांनी सांगितले.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---