एकदिवसीय क्रिकेट आणि अलिकडील काळात उदयास अालेल्या टी-२० क्रिकेटमुळे, क्रिकेट खेळाचा आत्मा असलेल्या कसोटी प्रारुपाची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात खालावली आहे.
गेल्या काही काळात कसोटी क्रिकेटच्या घसरलेल्या दर्जामुळे कसोटी क्रिकेटचे भविष्य धोक्यात असल्याचे भाकीत माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट जानकारांनी पूर्वीच वर्तवले आहे.
याच कसोटी क्रिकेटला वाचवण्यासाठी आता सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा मैदानात उतरला आहे. कसोटी क्रिकेटला वाचवण्यासाठी आणि त्याच्यात पुन्हा एकदा लोकप्रियता निर्माण करण्यासाठी कसोटी सामन्यांसाठी तयार करण्यात येणाऱ्या खेळपट्ट्या आव्हानात्म असाव्या असे मत सचिन तेंडुलकरने मांडले आहे.
“कसोटी क्रिकेटला पुन्हा एकदा लोकप्रियता आणि चांगले दिवस मिळवून देण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हेवे आहेत. तसेच कसोटी सामन्यांसाठी तयार करण्यात येणाऱ्या खेळपट्ट्या कोणत्याही एका संघासाठी लाभदायक ठरायला नकोत. जर खेळपट्टी आव्हानात्मक असेल सामने चुरशीचे होतील.” असे सचिन म्हणाला.
तेंडुलकर-मिडलसेक्स क्रिकेट आकादमीच्या प्रशिक्षण शिबीराचे पहिले सत्र संपल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात, सचिनने खेळपट्टीबरोबरच कसोटी क्रिकेटबाबत त्याची इतर मतेही व्यक्त केली.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
-फलंदाजीपेक्षा संजय मांजरेकर घंटा चांगली वाजवतात
-टीम इंडियाविरुद्ध दुसऱ्या कसोटीत शतक करणाऱ्या ख्रिस वोक्सने केला खास विक्रम