श्रीलंका संघाचा माजी गोलंदाज सचित्र सेनानायके याला मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली 6 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. श्रीलंकेसाठी तिन्ही प्ररकारामध्ये खेळलेल्या सेनानायकेवर 2020 मध्ये लंका प्रीमियर लीग दरम्यान सामना फिक्सिंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता. त्याने दोन खेळाडूंना सामना फिक्स करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. न्यायालयाने सेनानायके याला तीन आठवड्यांपूर्वी परदेशात जाण्यास बंदी घातली होती.
क्रीडा मंत्रालयाच्या विशेष तपास पथकासमोर आत्मसमर्पण केल्यानंतर सचित्र सेनानायके (Sachithra Senanayake) ला अटक करण्यात आली. सेनानायकेने सामना फिक्स करण्यासाठी दोन खेळाडूंशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधल्याचा आरोप आहे. या खटल्याची सुनावणी कोलंबोच्या मुख्य दंडाधिकारी न्यायालयात सुरू असताना सेनानायके यांना गेल्या महिन्यात देश सोडण्यास बंदी घालण्यात आली होती.
मॅच फिक्सिंगबाबत तिच्यावर झालेल्या आरोपांबाबत सेनानायके यनी हे पूर्णपणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. सेनानायकेने 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यानंतर त्याने श्रीलंकेसाठी 49 एकदिवसीय सामन्यांमध्ये 35.35 च्या सरासरीने 53 विकेट घेतल्या. सेनानायकेने 24 टी20 सामने खेळताना 25 विकेट घेतल्या आणि त्याला श्रीलंकेकडून 1 कसोटी सामना खेळण्याची संधीही मिळाली.
सेनानायके याने मॅच फिक्सिंगबाबत आपल्यावर लावण्यात आलेल्या आरोपांबाबत हे पूर्णपणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. त्याने 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यानंतर त्याने श्रीलंकेसाठी 49 वनडे सामन्यांमध्ये 35.35 च्या सरासरीने 53 बळी घेतले. दुसरीकडे, सेनानायकेने 24 टी20 सामने खेळताना 25 विकेट घेतल्या आणि त्याला श्रीलंकेकडून 1 कसोटी सामन्यात खेळण्याची संधीही मिळाली.
2014 मध्ये जेव्हा श्रीलंकेने भारताविरुद्ध टी20 विश्वचषक फायनल जिंकली तेव्हा सेनानायके देखील त्या संघाचा एक भाग होता. सेनानायकेने त्या विश्वचषकात 6 सामन्यात केवळ 4 विकेट घेतल्या होत्या. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत, सेनानायकेला संशयास्पद गोलंदाजी कृतीमुळे काही महिन्यांच्या बंदीलाही सामोरे जावे लागले आहे. सेनानायके हा आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघाचा देखील भाग आहे आणि त्याने 8 सामन्यात 9 विकेट घेतल्या आहेत. (sachithra senanayake arreseted in match fixing)
महत्वाच्या बातम्या-
Asia Cup 2023: सुपर- 4मधील पहिल्या सामन्यात बांगलादेश ‘टॉस का बॉस’, पाहा दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
नाद केला पण पुरा केला! 2023मध्ये कर्णधार म्हणून ‘अशी’ जबरदस्त कामगिरी एकट्या रोहितलाच जमली, वाचाच