क्रिकेटविश्वातून काळीज तोडणारी बातमी समोर येत आहे. ही बातमी देशांतर्गत क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूशी संबंधित आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील दिग्गज क्रिकेटपटू सय्यद हैदर अली यांचे निधन झाले आहे. ते 79 वर्षांचे होते. सय्यद यांचे निधन शनिवारी (दि. 05 नोव्हेंबर) प्रयागराज येथे झाले. त्यांच्या कुटुंबात दोन मुले सय्यद शेर अली आणि रजा अली आहेत. त्यांच्या निधनामुळे क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली आहे.
उत्कृष्ट फिरकीपटू असलेल्या सय्यद हैदर अली (Syed Haider Ali Death) यांच्याबद्दल दुर्दैवाची बाब अशी की, ते भारतासाठी कधीच खेळू शकले नाहीत. त्यांच्या निधनावर क्रिकेटविश्वातील अनेक खेळाडू शोक व्यक्त करत आहेत.
माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू रझा म्हणाले की, “मागील काही काळापासून त्यांच्या छातीत त्रास होत होता. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर आम्ही घरी परतत असतानाच ते अचानक कोसळले. त्यांचे शनिवारी दुपारी जवळपास दीड वाजता निधन झाले.”
सय्यद हैदर अली यांची कारकीर्द
सय्यद हैदर अली यांच्या कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी सन 1963 ते 1964 हंगामात त्यांनी रेल्वे संघासाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. विशेष म्हणजे, जवळपास 25 वर्षे ते रेल्वे संघासाठी खेळले होते. त्यांनी रेल्वे संघाकडून तब्बल 113 प्रथम श्रेणी सामने खेळले. यादरम्यान त्यांनी तब्बल 366 विकेट्स आपल्या नावावर केल्या. यामध्ये त्यांनी 3 वेळा 10 विकेट्स आणि 25 वेळा 5 विकेट्स घेतल्या होत्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘पोराला हात लावाल तर…’, मैदानावर आलेल्या चिमुकल्या चाहत्याला पोलिसांनी घेरताच हिटमॅन खवळला, Video व्हायरल
टीम इंडियाचा नवा ‘चाणक्य’ कर्णधार रोहित शर्मा! केलाय धोनीलाही न जमलेला पराक्रम