वनडे क्रिकेटमध्ये क्रिकेट चाहत्यांची अपेक्षा असते की, त्यांच्या आवडत्या फलंदाजाने मोठ्या धावांची खेळी करावी. जेणेकरुन अफलातून फटकेबाजी प्रदर्शन पाहून सामना अधिक रोमांचक वाटू लागतो. तसे पाहिले तर, आता अनेक क्रिकेटपटूंच्या नावावर वनडेमध्ये शतकांची किंवा द्विशतकांची नोंद आहे.
पण, आपण त्या वेळच्या विक्रमावर नजर टाकणार आहोत. जेव्हा वनडेत १५०पेक्षा जास्त धावा करणे फलंदाजाना खूप कठीण काम असल्याप्रमाणे वाटत होते. पण, अशा वेळी इंडिपेंडेंस चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये चक्क पाकिस्तानच्या एका सलामीवीर फलंदाजाने वनडेत २००च्या आसपास धावा करण्याचा अनपेक्षित कारनामा केला होता. विशेष म्हणजे, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरमुळे तो फलंदाज त्याचे वनडेतील द्विशतक पूर्ण करण्यात अपयशी ठरला होता.
ते वर्ष होते, १९९७. तेव्हा भारत आणि पाकिस्तान आपल्या स्वातंत्र्याचा ५०वा वर्धापनदिन साजरा करत होते. या शुभ मुहुर्तावर इंडिपेंडेंस चषकाचे आयोजन करण्यात आले होते. या चषकात फक्त ४ देश भाग घेणार होते. यामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि न्यूझीलंड यांचा समावेश होता.
चेन्नई येथे भारत विरुद्ध पाकिस्तान संघात चषकातील ६वा सामना चालू होता. त्यावेळी पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी सलामीला फलंदाजी करताना पाकिस्तानचा फलंदाज सईद अनवरने १४६ चेंडूत दमदार १९४ धावांची खेळी केली होती. त्याच्या या कारनाम्यामुळे वनडे क्रिकेटच्या इतिहासात त्याच्या नावाची नोंद झाली. Saeed Anwar’s massive 194 runs against india i the independence cup match in chennai.
जरी अनवरने आपल्या नावावर वनडेत सर्वाधिक धावा करण्याच्या विश्वविक्रमाची नोंद केली असली. तरी, त्याला केवळ ६ धावांमुळे आपल्या हातून द्विशतक करण्याची संधी हुकल्याचे दुख:ही होते. मजेशीर गोष्ट ही होती की, अनवर हा सचिनच्या गोलंदाजीवर बाद झाला होता. सचिनच्या चेंडूवर सौरव गांगुलीने झेल झेलत अनवरला झेलबाद केले होते.
पुढे २००९मध्ये झिम्बाब्वेच्या चार्ल्स कोवेंट्रीने अनवरच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली होती. त्याने नाबाद १९४ धावा करत हा कारनामा केला होता. मात्र, ज्या मास्टर ब्लास्टरने अनवरला द्विशतक करण्यापासून रोखले होते. त्याच मास्टर ब्लास्टरने २४ फेब्रुवारी २०१०मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या वनडे सामन्यात नाबाद २०० धावा करत अनवरचा विश्वविक्रम मोडला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
पंचवीस वर्षांपूर्वी चेपॉकवर घडलेला इतिहास, भारताविरुद्ध ‘या’ फलंदाजाने केलेली तुफान फटकेबाजी
बॉलर नहीं, फिनिशर हू मैं! अश्विनने राजस्थानला मिळवून दिलं ‘क्वालिफायर १’चं तिकीट, होतंय कौतुक
राजस्थानच्या चेन्नईवरील विजयाने लखनऊला धक्का, फायनलमध्ये जागा मिळवण्यासाठी संजूपुढे गुजरातचे आव्हान