---Advertisement---

सागर राणा हत्या प्रकरण: ऑलम्पिक विजेता सुशील कुमारवर आरोपनिश्चिती; दिल्ली कोर्ट सुनावणार शिक्षा

On: बुधवार, ऑक्टोबर 12, 2022 7:11 PM
---Advertisement---

कुस्तीपटू सागर राणा हत्या प्रकरणात दिल्ली न्यायालयाने दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारसह एकूण 17 जणांवर आरोप निश्चित केले आहेत. खून, हत्येचा प्रयत्न, दंगल आणि इतर गुन्हेगारी कलमांखाली न्यायालयाने हे आरोप निश्चित केले. या प्रकरणात 17 पैकी 2 आरोपी फरार असून, त्या फरार आरोपींवरही न्यायालयाने आरोप निश्चित केले आहेत.

दिल्ली पोलिसांनी 13 आरोपींवर आयपीसी कलम 302 (हत्या), 307 (हत्येचा प्रयत्न), 147 (दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करणे) आणि 120 (बी) गुन्हेगारी कट रचणे यासह अन्य कलमांखाली आरोपपत्र दाखल केले आहे. या खटल्यात फिर्यादी पक्षाने 155 साक्षीदार हजर केले होते.

काय आहे हे प्रकरण
सुशील कुमार यांचे सासरे व जगप्रसिद्ध भारतीय मल्ल सतपाल यांचा दिल्लीस्थित छत्रसाल आखाडा आहे. याठिकाणी अनेक तरुण कुस्तीपटू प्रशिक्षण घेत असतात. मागील वर्षी 4 मे रोजी या ठिकाणी दोन गटांमध्ये वाद झाल्याची बातमी समोर आली होती. सागर राणा व त्याचे मित्र सोनू आणि अमित कुमार या तरूण खेळाडूंना काही वरिष्ठ कुस्तीपटूकडून मारहाण झालेली. यापैकी सागर राणा याचा काही दिवसांनंतर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या प्रकरणी दोन वेळचा ऑलिम्पिक विजेता भारतीय कुस्तीपटू सुशील कुमार व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आलेला. त्यानंतर फरार झालेल्या सुशीलकुमार व त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांनी वॉरंट जारी केलेले. अखेरीस, २३ मे रोजी सुशील व त्याचा साथीदार अजय यांना दिल्ली शेजारील मुंडका येथून ताब्यात घेण्यात आले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आल्याने सुशील कुमार यांच्या विरोधात पोलिसांना सबळ पुरावा सापडला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चालू सामन्यात ज्युनिअरच्या अंगावर धावून गेला अंबाती रायुडू, पंचांनाही खटकलं कृत्य
‘ते दोघं वनडेत पंतची जागा घेऊ शकत नाहीत’, भारतीय दिग्गजाने कुणाबद्दल केले मोठे वक्तव्य?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---