दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममध्ये ५ मे रोजी कुस्तीपटुंच्या दोन गटांमध्ये खरीखुरी दंगल न रंगता मोठा दंगा झाल्याचे पाहायला मिळाले होते. मॉडेल टाऊन पोलीसस्थानक परिसरात या कुस्तीपटुंच्या दोन गटांमध्ये जबरदस्त हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले होते. या चकमकीत पाच जण जखमी झाले होते. त्यापैकी माजी राष्ट्रीय ज्युनिअर पदक विजेता कुस्तीपटू सागर धनखड याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
हत्येचा आरोप असलेला २ वेळेस ऑलिम्पिक पदक मिळवणारा कुस्तीपटू सुशील कुमार आणि त्याचा सहकारी अजय हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून फरार आहेत. अशातच आता त्यांना शोधून काढणाऱ्यांना दिल्ली पोलिसांकडून मोठी रक्कम बक्षीस म्हणून मिळणार आहे.
दिल्ली पोलिसांना सुशील कुमार आणि अजय कुमार यांचा शोध घेण्यास अद्याप यश आलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये याच प्रकरणाची चर्चा आहे. त्यामुळे सुशील कुमारला अटक करून देण्यात मदत करणाऱ्याला १ लाखांचे बक्षीस मिळणार असल्याची घोषणा दिल्ली पोलिसांनी केली आहे. तर अजयला अटक करून देण्यात मदत करणाऱ्याला ५० हजारांचे बक्षीस मिळणार आहे. सोमवारी उशिरा रात्री पोलिसांनी या बक्षिसाची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती उत्तर पश्चिमी जिल्हा पोलिस उपायुक्त यांनी दिली आहे.
आधीच फरार सुशील कुमार विरोधात अजामीनपत्र वॉरंट प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्याआधी त्याच्याविरुद्ध लुकआउट परिपत्रक देखील प्रसिद्ध करण्यात आले होते. अलीकडेच दिल्ली पोलिसांनीही सुशील कुमार फरार असल्यासंदर्भात दिल्ली सरकारला पत्र लिहून म्हटले होते की, हत्या आणि अपहरणाच्या एका प्रकरणात तो फरार आहे.
सुशील छत्रसाल स्टेडियममध्ये उपसंचालकाची भूमिका पार पाडतो. याच स्टेडियममध्ये ५ मे रोजी कुस्तीपटुंच्या दोन गटात जबर मारहाण झाली होती. या हाणामारीत ज्युनियर कुस्तीपटू सागर मारला गेला. या घटनेत लॉरेन्स बिश्नोई आणि काला जखेडी गँगच्या दरोडेखोरांचा सहभागही समोर आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“सुशीलमुळे कुस्ती क्षेत्राची नाचक्की”, कुस्ती महासंघाची ‘त्या’ घटनेवर मोठी प्रतिक्रिया
दोन वेळच्या ऑलिंपिक विजेता कुस्तीपटूचा दिल्ली पोलिसांनी सुरू केला शोध, हत्येच्या आरोपात आहे फरार