---Advertisement---

आॅस्ट्रेलिया दौऱ्यासाठी पंत की साहा, निवड समितीसमोर मोठा पेचप्रसंग

---Advertisement---

भारतीय संघाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत विंडिजचा 2-0 असा पराभव केला. विंडिजच्या संघाचा प्रतिकार खूपच तोकडा पडला. दोन्ही सामने तिसऱ्या दिवशीच संपले.

भारतीय संघातील दोन युवा खेळाडू पृथ्वी शाॅ आणि रिषभ पंत यांच्या कामगिरीने संघातील वातावरण खूपच सकारात्मक झाले आहे. भविष्यात भारताबाहेरही त्यांच्याकडून अशा कामगिरीची अपेक्षा ठेवली जात आहे.

पदार्पणातच पृथ्वी शाॅने दमदार कामगिरी केली तर आपला इंग्लड दौऱ्यातील फाॅर्म कायम ठेवण्यात रिषभ पंतला यश आले आहे.

पंतच्या ह्या कामगिरीने आॅस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाचा पूर्णवेळ यष्टीरक्षक कोण असणार याचे प्रश्नचिन्ह निवड समितीसमोर निर्माण केले आहे.

वृद्धीमान साहा दुखापतीतून सावरला आहे आणि भारतीय संघाकडून खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.

“पंत हा एक चांगला फलंदाज असून स्टम्पच्या पाठीमागेही तो चांगली कामगिरी करत आहे. कामगिरीच्या आधारे आॅस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघ निवडला जाणार आहे.” असे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी सांगितले.

शास्त्री यांनी संघात कुणाला संधी मिळणार याचे गुढ तसेच ठेवले आहे. रिषभ पंतने आपल्या जबरदस्त खेळ्यांनी संघ व्यवस्थापनाला प्रभावित केले आहे. अंतिम अकरा मध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी रिषभला यष्टीमागील कामगिरीत आणखी सुधारणा करावी लागेल.

आपल्या अप्रतिम यष्टीरक्षणाने धोनीच्या निवृत्तीनंतर भारतीय संघात स्थान मिळवण्याऱ्या वृद्धीमान साहाला भारतीय संघात स्थान टिकवून ठेवण्यासाठी फलंदाजीत चांगली कामगिरी करून दाखवावी लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या- 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment