भारतीय पुरुष एकेरी बॅडमिंटन खेळाडू साई प्रणीतने इंडोनेशियन खेळाडू जोनाथन ख्रिस्तीला हरवून इंडोनशियन ओपन ग्रँड प्री स्पर्धा जिंकली.
सामना तीन सेट पर्यंत चलला होता. पहिल्या सेटमध्ये पहिल्यापासून इंडोनेशियन खेळाडूने बढत घेतली होती. पहिला सेट इंडोनेशियन खेळाडूने २१-१७ असा जिंकला.
अंतिम सामन्यात टिकून रहायचे असेल तर पुढचा सेट साईला जिंकणे अतिशय गरजेचे होते,त् यामु़ळे साईने सुरुवात चांगली केली आणि ९-३ अशी बढत घेतली. पण ख्रिस्तीने सलग सहा गुण घेत बरोबरी साधली. त्यानंतर साईने चांगला खेळ करत दुसरा सेट २१-१८ असा जिंकला.
सामन्याचा निकाल तिसऱ्या सेटवर अवलंबून होता. तिसऱ्या सेटमध्ये ३-८ ने पिछाडीवर असताना साईने खेळ उंचावला. शेवटी १९-१९ अश्या अटीतटीच्या स्थितीत सेट आला होता, सामना कोणाच्याही बाजूने झुकू शकला असता पण साईने अनुभवाचा फायदा घेत सेट आपल्या नावे केला आणि अंतिम सामना जिंकत चषकाचवर आपले नाव कोरले.