इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात झालेला पहिला वनडे सामना चित्तथरारक राहिला. भारतीय संघाने या सामन्यात जबरदस्त प्रदर्शन करत इंग्लंडवर १० विकेट्सने ऐतिहासिक विजय मिळवला. विशेष म्हणजे, या सामन्याला काही खास पाहुण्यांनी उपस्थिती लावली होती. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सहकुटुंब हा सामना पाहायला लंडन येथे गेला होता. सैफची पत्नी करीना कपूर हिने त्यांचे स्टेडियममधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
लंडनच्या (ENG vs IND) केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात पटौडी कुटुंबाने त्यांच्या ग्लॅमरचा तडका लगावला. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान मुलगा तैमूर (Taimur Saif Ali Khan) याच्यासह हा सामना पाहायला आला होता. तैमूरने पहिल्यांदाच कोणत्या क्रिकेट स्टेडियममध्ये जाऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना पाहिला आहे. यादरम्यान त्याने भरपूर मस्तीही केली.
करीना कपूरने मुलगा तैमूरचे स्टेडियममधील फोटो आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केले आहेत. तिने एकूण ३ फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये तैमूर स्टेडियममध्ये असल्याचे दिसत आहे. दुसऱ्या फोटोत सैफ असून तो वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज गॉर्डन ग्रीनीज यांच्यासह दिसत आहे. तर तिसऱ्या फोटोत सैफ मुलगा तैमूरसह बाकी दर्शकांसह बसलेला दिसत आहे. करीनाने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
खास बाब अशी की, तैमूरसाठी त्याचा हा स्टेडियममधून सामना पाहण्याचा पहिलाच अनुभव दमदार राहिला. कारण भारतीय संघाने या सामन्यात धमाकेदार प्रदर्शन केले आणि इंग्लंडला ११० धावांवरच रोखले. प्रत्युत्तरात रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी धडाकेबाज फलंदाजी करत संघाला १० विकेट्सने विजयही मिळवून दिला.
सैफ अली खानचे क्रिकेटशी जवळचे नाते
तसे पाहिले तर, सैफचे क्रिकेटशी फारच विशेष नाते आहे. जरी सैफ प्रत्यक्षात क्रिकेटशी जोडला गेला नसला तरी, त्याचे वडील मंसूर अली खान पटौडी हे महान क्रिकेटपटू राहिले आहेत. त्यांनी भारतीय संघाचे नेतृत्त्वही केले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवाब पटौडी यांचे अनेक विक्रम आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडमधील भारतासाठी ‘हे’ मैदान ठरलयं लकी! झाली ऐतिहासिक विजयाची नोंद, वाचा सविस्तर
हे नवीनच! टॉवेलमुळे गोलंदाजाच्या मेहनतीवर फिरले पाणी, बाद झालेला फलंदाज राहिला नाबाद
‘आता काही दिवस फक्त रणजीच खेळ’, कोहलीला ‘या’ दिग्गजाने दिला सल्ला