डेन्मार्क ओपनची सुरुवात भारतीयांसाठी मिश्र स्वरूपाची झाली. या सुपर सिरीजमध्ये जिच्याकडून पदकाची सर्वात जास्त अशा होती ती पीव्ही सिंधू पहिल्याच फेरीत गारद झाली. साईना नेहवालने दोन वेळची विश्वविजेती कॅरोलिना मरीनला पहिल्याच फेरीत हरवत सर्वात मोठा उलटफेर केले. जपान ओपन जिंकल्याने या स्पर्धेत मरीनकडे विजेतेपदाची प्रबळ दावेदार म्हणून पहिले जात होते.
साईनाने पहिल्या फेरीत मरीनवर विजय मिळवत जपान ओपनच्या दुसऱ्या फेरीतील पराभवाचा वचपा काढला. सिंधूला १०व्या मानांकीत चेनचे आव्हान परतवून लावता आले नाही. तीला चेनने २१-१७,२३-२१असे पराभूत केले. सिंधूवर सलग दोन सुपर सिरीजमध्ये पहिल्या फेरीत स्पर्धेबाहेर जाण्याची वेळ आली.
भारतीय पुरुष खेळाडूंमध्ये आघाडीचा खेळाडू किदांबी श्रीकांत आणि प्रणॉय कुमार यांनी आपले पहिल्या फेरीतील सामने जिंकले. साई प्रणितवर पहिल्याच फेरीत स्पर्धेबाहेर जाण्याची नामुष्की ओढवली.
श्रीकांतचा पहिला सामना पात्रता फेरी जिंकून आलेल्या भारताच्या शुभंकर डे यांच्यासोबत होता. हा सामना श्रीकांतने २१-१७,२१-१५ असा जिंकला. श्रीकांत किदांबीचा पुढचा सामना कोरियाच्या जीऑन हेयोक याच्याविरुद्ध होणार आहे. जीऑन हेयोक याने २०१६ साली ऑस्ट्रेलियन ओपेनचा उपविजेतेपद पटकावले होते.
साई प्रणीत याला डेन्मार्कच्या हान्स -क्रिस्टेन सोलबेर्ग याने २१-१०,२१-१५ असे नमवले.
प्रणॉय याचा सामना डेन्मार्कच्या एमिल होलस्ट यांच्या बरोबर होता. पहिला सेट त्याने २१-१८ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये त्याने ११-६ अशी पिछाडी भरून काढत दुसरा सेट जिकंत सामना २१-१८,२१-१९ असा जिंकला. त्याचा पुढचा सामना माजी जागतिक अग्रमानांकीत मलेशियन खेळाडू ली चँग वेई यांच्याबरोबर होईल.
अन्य भारतीय खेळाडूंमध्ये सात्विकराज रंकिरेड्डी याला मिश्र दुहेरी आणि पुरुष दुहेरीत पराभव करावा लागल्याने त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. सात्विक आणि त्याची मिश्र दुहेरीचे साथीदार अश्विनी पोनप्पा यांनी डच ओपनची सेमी फायनल गाठली होते ते डेन्मार्क ओपनमध्ये पहिल्याच फेरीत पराभूत झाले. त्यांना स्थानिक मिश्र दुहेरी खेळाडू निकलस नोर आणि सारा थ्यगेन्सन यांनी २१-१९,२१-१७ असे पराभौत केले.