---Advertisement---

WBC: ‘भारताच्या स्वप्नांचा चुरडा!’ सायना नेहवाल प्री-क्वाटर सामन्यात पराभूत

On: गुरूवार, ऑगस्ट 25, 2022 4:48 PM
Saina-Nehwal
---Advertisement---

ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल गुरुवारी महिला एकेरीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये बुसानन ओंगबामरुंगफानकडून पराभूत झाल्यानंतर बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून बाहेर पडली. ३२ वर्षीय भारतीय स्टार खेळाडूला थायलंडच्या प्रतिस्पर्ध्याकडून १७-२१, २१-१६ आणि १३-२१ असा पराभव पत्करावा लागला.

दुसरीकडे दोन भारतीय पुरुष दुहेरीच्या जोडीला उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यश आले. ध्रुव कपिला आणि एमआर अर्जुन आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने पुढच्या फेरीत प्रवेश केला. अर्जुन आणि कपिला या बिगरमानांकित जोडीने ५८ मिनिटांच्या रोमहर्षक लढतीत सिंगापूरच्या टेरी ही आणि लोह कीन हीन यांचा १८-२१, २१-१५, २१-१६ असा पराभव केला.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘तू आता चांगला नाचतोस!’ पुजाराने दिलेल्या उत्तरामुळे आकाश चोप्राची बोलती बंद
‘मी जगातील सर्वात महान फिरकीपटू’, ख्रिस गेलने खास शैलीत केले स्वत:चे कौतुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---