पुणे, दि.23 ऑगस्ट 2022- पीवायसी हिंदू जिमखाना क्लब यांच्या वतीने आयोजित आठव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात सैनुमेरो जालन गोशॉक संघाने ऍक्चुअल फिनिक्स संघाचा 4-2 असा पराभव करून विजयी सलामी दिली.
पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत सलामीच्या लढतीत सैनुमेरो जालन गोशॉक संघाने ऍक्चुअल फिनिक्स संघावर 4-2 असा विजय मिळवला. सामन्यात गोल्डन खुला दुहेरी गट 1मध्ये गोशॉकच्या मिहीर विंझे व समीर जालन यांना फिनिक्सच्या प्रतीक धर्माधिकारी व आशय कश्यप यांनी 10-21, 16-21 असे पराभूत केले. पण गोल्डन खुला दुहेरी 2 गटात गोशॉकच्या मकरंद चितळे व सिद्धार्थ निवसरकर यांनी फिनिक्सच्या गंधार देशपांडे व तन्मय चोभे यांचा 21-13, 21-16 असा पराभव करून बरोबरी साधली.
गोल्डन मिश्र दुहेरी गटात गोशॉकच्या तुषार मेंगळे व सारा ठाकोर या जोडीला फिनिक्सच्या कर्ना मेहता व सारा नवरे यांनी 15-21, 08-21 असे नमविले. पण पुढच्याच लढतीत सिल्व्हर खुला दुहेरी गट 3मध्ये गोशॉकच्या अनिकेत सहस्रबुद्धे व योहान खिंवसरा यांनी फिनिक्सच्या अजिंक्य मुठे व नीरज दांडेकर यांचा 21-13, 21-18 असा तर, सिल्व्हर दुहेरी गट 4मध्ये गोशॉकच्या अमर श्रॉफने हरीश अय्यर च्या साथीत अभिजीत खानविलकर व अनुज मेहता या जोडीचा 21-15, 21-15 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. अखेरच्या वाईजमन गटात गोशॉकच्या अविनाश दोशीने गिरीश खिंवसराच्या साथीत फिनिक्सच्या आश्विन हळदणकर व कौस्तुभ वाळिंबे यांचा 21-01, 21-07 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला. सामनावीर हरीश अय्यर ठरला.
स्पर्धेचे उदघाटन ट्रुस्पेसचे उल्हास त्रिमल, पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबचे मानद सचिव सारंग लागु, क्लबच्या बॅडमिंटन विभागाचे सचिव तन्मय आगाशे, स्पर्धा संचालक नंदन डोंगरे, विनायक द्रविड, अभिषेक ताम्हाणे, शिरीष साठे, सिद्धार्थ भावे, तुषार नगरकर, कपिल खरे आदी मान्यवर उपस्थित होते. रणजित पांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
सैनुमेरो जालन गोशॉक वि.वि. ऍक्चुअल फिनिक्स 4-2 (गोल्डन खुला दुहेरी गट 1: मिहीर विंझे/समीर जालन पराभुत वि.प्रतीक धर्माधिकारी/आशय कश्यप 10-21, 16-21; गोल्डन खुला दुहेरी 2: मकरंद चितळे/सिद्धार्थ निवसरकर वि.वि.गंधार देशपांडे/तन्मय चोभे 21-13, 21-16; गोल्डन मिश्र दुहेरी गट: तुषार मेंगळे/सारा ठाकोर पराभुत वि.कर्ना मेहता/सारा नवरे 15-21, 08-21; सिल्व्हर खुला दुहेरी गट 3: अनिकेत सहस्रबुद्धे/योहान खिंवसरा वि.वि.अजिंक्य मुठे/नीरज दांडेकर 21-13, 21-18; सिल्व्हर दुहेरी गट 4: अमर श्रॉफ/हरीश अय्यर वि.वि.अभिजीत खानविलकर/अनुज मेहता 21-15, 21-15; वाईजमन: अविनाश दोशी/गिरीश खिंवसरा वि.वि.आश्विन हळदणकर/कौस्तुभ वाळिंबे 21-01, 21-07)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाच्या टी२० स्पेशालिस्टला करायचयं कसोटी संघात पुनरागमन; भारताबद्दल म्हणाला…
‘दीपक हुड्डासोबत प्रॅक्टिस सेशन परवडत नव्हते, तो बॉल थेट…’, प्रशिक्षकांनीच दिले स्पष्टीकरण
मोठी बातमी। सानिया मिर्झाने यूएस ओपनमधून घेतली माघार! पोस्ट करत सांगितले खरे कारण