पुणे । येथे सुरु असलेल्या एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित चौथ्या 50000डॉलर +हॉस्पिटॅलिटी केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारतीय जोडी साकेत मायनेनी आणि जीवन नेदूंचेझियानचे आव्हान संपुष्ठात आले आहे. त्यांना पेद्रो मार्टिनेझ आणि एड्रियन मेनेंडेझ मासियर्स जोडीने ६-४, ६-४ असे पराभूत केले.
अंतिम फेरीत पेद्रो मार्टिनेझ आणि एड्रियन मेनेंडेझ मासियर्स जोडी विजेतेपदासाठी टॉमीसाल ब्रँकिव आणि अँटे पॅनिव जोडीशी उद्या अर्थात शनिवारी लढेल.
Pedro Martinez and Adrian Menendez-Maceiras beat Saketh Myneni and Jeevan Nedunchezhiyan 6-4 6-4 in the semi final at Pune #ATPChallenger
— Live Tennis Results (@tennis_result) November 17, 2017