---Advertisement---

रेकॉर्ड अलर्ट! प्रथम श्रेणी पदार्पणात बिहारच्या क्रिकेटरचं त्रिशतक, केला एकच नंबर विश्वविक्रम

Sakibul-Gani
---Advertisement---

बिहारचा रणजी क्रिकेटपटू साकिबुल गनीने इतिहास रचला आहे. प्रथम श्रेणी पदार्पणात त्रिशतक झळकवणारा साकिबुल पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. कोलकत्ता येथे मिझोरमविरुद्धच्या रणजी सामन्यात त्याने ही कामगिरी केली आहे. २२ वर्षीय साकिबुलने ३८७ चेंडूत ५० चौकार लगावत त्रिशतक झाळकावले आहे. हा एक विश्वविक्रम आहे. साकिबुल शेवटी ३४१ धावा करुन बाद झाला. त्याला इकबाल अब्दुल्लाच्या चेंडूवर तरुवर कोहलीने झेल घेत बाद केले. त्याने आपल्या मॅरेथॉन खेळीत ४०५ चेंडूंचा सामना करताना ५६ चौकार आणि २ षटकार मारले.

याआधी प्रथम श्रेणी पदार्पणात सर्वोच्च वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम अजय राजकुमार रोहेराच्या नावावर होता. रोहराने २०१८-१९ च्या रणजी हंगामात मध्य प्रदेशकडून खेळत हैद्राबाद संघाविरुद्ध नाबाद २६७ धवांची खेळी खेळली होती.

या सामन्यात साकिबुल गनीने चौथ्या विकेटसाठी बाबुल कुमारसोबत ५३८ धावांची भागीदारी केली. बाबुल कुमारनेही द्विशतक झळकावले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात मोठ्या भागीदारीचा विक्रम कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांच्या नावावर आहे. २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध श्रीलंकेच्या दोन्ही फलंदाजांनी ६२४ धावांची भागीदारी केली.

प्रथम श्रेणी क्रिकेटच्या पदार्पणात एरिक मार्क्सने १९२० मध्ये २४० धवांची खेळी केली होती. त्यानंतर २०१७ मध्ये बहीर शाहने २५६, १९९४ मध्ये अमोल मजुमदारने २६० धावा, २०१८ मध्ये अजय रोहेराने २६७ धावांची खेळी खेळली होती. यानंतर साकीबुल गनीने ३४१ धावांची सर्वोत्तम खेळी खेळली आहे.

साकिबुल गनीबद्दल थोडेसे
२ सप्टेंबर १९९९ मध्ये मोतिहारीमध्ये साकिबुलचा जन्म झाला. गनीने ७ ऑक्टोबर २०१९ रोजी २०१९-२० विजय हजारे ट्रॉफीमध्ये बिहारसाठी लिस्ट ए मध्ये पदार्पण केले. त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत आतापपर्यंत १४ अ दर्जाच्या सामन्यात ३१.४१ च्या सरासरीने ३३७ धावा केल्या आहेत. यामध्ये एका अर्धशतकाचा आणि एका शतकाचा समावेश आहे. तसेच ११ टी२० सामन्यांमध्ये त्याने २७.४२ च्या सरासरीने १९२ धावा केल्या आहेत. बिहार क्रिकेट लीगमध्‍ये साकिबुल गनी ५० हजारात विकला गेला होता. त्‍याने ६ डावात १६ चौकार आणि १४ षटकारांसह २२४ धावा ठोकल्‍या होत्या. गनीने २०१८ मध्ये २३ वर्षांखालील स्पर्धेमध्ये द्विशतक झळकावले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

उपांत्य फेरीचे स्वप्न घेऊन मोहन बागान मैदानावर उतरणार; केरला ब्लास्टर्सला कडवी टक्कर देणार

दुसऱ्या टी२०त कायरन पोलार्डचे स्पेशल ‘शतक’, संघाने खास भेट देत बहुमूल्य क्षणाला बनवले अविस्मरणीय 

दुसरी टी२०: नाणेफेक जिंकून पोलार्डचा गोलंदाजीचा निर्णय, वेस्ट इंडिज संघात खतरनाक अष्टपैलूचे पुनरागमन

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---