जगभरात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतासह अनेक देश या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. रोज लाखो लोकांना या रोगाची लागण होत आहे. अशातच बुधवारी (२१ एप्रिल) सकाळी वृत्त आले की भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या आई-वडीलांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर बुधवारी रात्री उशीरा त्यांच्या आरोग्याबाबत एमएस धोनीची पत्नी साक्षीने अपडेट्स दिले आहेत.
माध्यमांतील अहवालानुसार, धोनीचे वडील पान सिंग धोनी आणि आई देवकी देवी यांना कोविड-१९ चे संक्रमण झाले आहे. त्यानंतर त्यांना रांचीमधील बरियातू रोड स्थित पल्स हॉस्पिटमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. हे वृत्त समजताच भारतातून धोनीच्या चाहत्यांकडून त्याचे आई-वडील लवकर बरे व्हावेत अशा शुभेच्छा येत आहेत.
त्यांच्या आरोग्याबाबत साक्षीने इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर केली आहे. तिने या पोस्टमध्ये तिने म्हटले आहे की ‘सर्वांनी विचारपूस केल्याबद्दल धन्यवाद. माझ्या सासू-सारऱ्यांची तब्येत आता स्थिर आहे. तसेच त्यांची चांगल्या प्रकारे काळजी घेतली जात आहे. तुमच्या प्रार्थनांमुळे त्यांच्या आरोग्यात लवकर सुधारणा होत आहे.’
धोनी सध्या आयपीएलमध्ये व्यस्त
एमएस धोनी हा मागील महिन्यापासून इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्स संघासोबत आहे. तसेच सध्या चेन्नई सुपर किंग्सचे सामने मुंबईत सुरु असल्याने तोही मुंबईत आहे. तसेच तो जरी मुंबईत असला तरी साक्षी आणि त्याची मुलगी झिवा त्याच्यासह मुंबईत आहेत की त्यांच्या घरी रांचीमध्ये आहेत, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
धोनी चेन्नईचा कर्णधार आहे. चेन्नईने यंदाच्या हंगामाची सुरुवात चांगली केली आहे. या हंगामातील पहिला सामना पराभूत झाल्यानंतर चेन्नईने पुढील सलग तीन सामने जिंकले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
फॅन मुमेंट! तगड्या लढतीनंतर आवेश खानमधील रोहित शर्माचा चाहता झाला जागा, केली ‘ही’ खास गोष्ट
‘चेन्नईकडून खेळताना कधी पाहू शकतो?’ चाहत्याच्या प्रश्नाला ताहिरने मन जिंकणारे उत्तर
प्रज्ञान ओझाचा मोठा खुलासा ‘धोनी सामन्यापूर्वी संघातील सदस्यांना देत नाही शुभेच्छा, कारण…”