---Advertisement---

धोनी खरंच भारीये राव!, साक्षी सिंग धोनीने शेअर केलेला व्हिडिओ पाहून तु्म्हीही हेच बोलणार

On: सोमवार, जून 13, 2022 11:09 PM
Ms-Dhoni-Sakshi-Dhoni
---Advertisement---

भारतात प्रत्येक व्यक्तीला काहीना काही विशेष गोष्टी करण्याची आवड आहे. या आवडीत अनेकदा आपल्या सर्वांचे लाडके क्रिकेटपटू देखील वाचू शकले नसल्याचे दिसून येते. अनेकदा क्रिकेटपटू आपल्या विशेष आवडी जोपासताना दिसत असतात. काही खेळाडू त्यांच्या आवडीनुसार नवनवीन गाड्या विकत घेत असतात, काहीजण वेळ मिळाल्यावर आवडत्या ठिकाणी फिरायला गेलेले दिसतात. मात्र, या सर्वांमध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपले वेगळेपण पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.  

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला कार, बाईक सोबतच प्राणी पाळण्याची खूप आवड आहे. धोनीने आपल्या रांची येथील फार्म हाऊसमध्ये घोडे आणि कुत्रे पाळले आहेत, मात्र आता तेथे बकऱ्याही दाखल झाल्या आहेत. खरं तर, धोनीची पत्नी साक्षीने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये दोन अतिशय सुंदर शेळ्या आनंदाने गवत खाताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/reel/CetL4AUABE2/?utm_source=ig_web_copy_link

मीडिया रिपोर्ट्सनुसार, धोनीने एक वर्षापूर्वी ही शेळीची पिल्ले गुजरातमधून आणली होती, पण ती आधी त्याने आपल्या फार्म हाऊसमध्ये ठेवली नाहीत. मोठे झाल्यानंतर त्यांना येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. तसे, धोनीच्या फार्म हाऊसवर प्राण्यांशिवाय पोपटही आहेत. धोनीच्या घरी या नवीन पाहुण्यांना पाहिल्यानंतर क्रिकेट चाहते खूप उत्सुक दिसत आहेत आणि साक्षी धोनीने शेअर केलेल्या व्हिडिओवर विविध कमेंट्स केल्या जात आहेत.

दरम्यान, भारतासाठी दोन विश्वचषक जिंकणारा एमएस धोनी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे, तर तो फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. २०२२ मध्ये, त्याने चेन्नई सुपर किंग्ज संघाचे कर्णधारपद सोडले, परंतु नंतर संघाची स्थिती बिघडल्यानंतर तो पुन्हा संघाचा कर्णधार बनला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. चेन्नईला या हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचण्यात अपयश आले. चेन्नईने यंदाच्या हंगामात संघाने १४ पैकी ४ सामने जिंकले, तर १० सामने गमावले आणि ८ गुणांसह हा संघ नवव्या क्रमांकावर होता.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘सचिन नंतर फक्त ‘या’ खेळाडूचा खेळ बघण्यास उत्सुक आहे’, सुनिल गावस्करांनी जाहिर केली इच्छा

ऋतुराजला संघात पुन्हा स्थान मिळणे कठीण!, ‘ही’ आहेत त्याची प्रमुख कारणे

BIG NEWS। बीसीसीआयने माजी क्रिकेपटूंना दिला मोठा दिलासा, मासिक पेन्शनमध्ये केली तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---