---Advertisement---

साक्षी धोनीने शेअर केला हिमाचलचा मनमोहक व्हिडिओ; अनुष्का शर्मा, धनश्री वर्माने दिल्या खास प्रतिक्रिया

On: शनिवार, जून 26, 2021 1:31 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद सिंग धोनी सध्या त्याच्या नवीन लूकमुळे खूप चर्चेत आहे. पण, धोनी फारसा सोशल मीडियावर सक्रिय नसतो, मात्र धोनीची पत्नी साक्षी ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा धोनीचे वेगवेगळे फोटो व व्हिडिओ शेअर करत असते.

सध्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (एमएस धोनी) आपल्या परिवारासह हिमाचल प्रदेशमध्ये सुट्टीसाठी गेला आहे. या सुंदर राज्यास भेट देण्याव्यतिरिक्त, तो डोंगरावर कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. धोनीची पत्नी साक्षीने या सुट्टीतील अनेक छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आता तिने इन्स्टाग्रामवर एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे आणि ते त्यांच्या ट्रिपच्या शेवटच्या दिवसाचा आहे. साक्षी धोनीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ती हिमाचलच्या स्थानिक जीवनाची झलक चाहत्यांना दाखवित आहे.

व्हिडिओ व्हायरल 
गुरुवारी (२४ जून) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती हिमाचलच्या रस्त्यांवर फिरणाऱ्या मेंढ्यांच्या कळप दिसत आहे. या कळपासोबत मेंढपाळही असल्याचे दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना, तिने लिहिले की ‘हा अनुभव संपत असताना, पुढे काय आहे याची उत्सुकतेने वाट पाहत आहोत! उबदार पाहुणचार, साधे लोक आणि एक सुंदर ठिकाण! लवकरच भेटू हिमाचल!’

साक्षीचा हा व्हिडिओ काही तासांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मापासून युजवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. या व्हिडिओवर अनुष्काने हार्ट इमोजी पाठविला आहे. ही व्हिडिओ 1 लाखाहून अधिक लोकांना आवडला आहे. त्याचवेळी काही चाहत्यांनी साक्षीला धोनीबद्दल विचारले आहे, तसेच त्याची एक झलक दाखवण्याची विनंती केली आहे.

https://www.instagram.com/p/CQdfKkunFuV/

धोनीचा नवीन लूक व्हायरल झाला
काही दिवसांपूर्वीच एमएस धोनीचा हिमाचल मधील एक फोटो व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो त्याच्या मिशा आणि स्टायलिश दाढीसह आपल्या नव्या लूकमध्ये अगदी हँडसम दिसत आहे. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आणि बर्‍याच चाहत्यांनीही त्याच्या या लूकची कॉपी करण्यास सुरवात केली.

महत्वाच्या बातम्या

‘देव आपल्याला वाचवणार नाही म्हणत,’ धोनीने खेळाडूंना केले प्रोत्साहित; मग काय भारत बनला चॅम्पियन

इंग्लंडविरुद्ध गिलऐवजी अग्रवालला देण्यात यावी संधी, ‘ही’ आहेत त्यामागची प्रमुख कारणे

अन् चॅलेंज पूर्ण करताच ‘गब्बर’ने आनंदाने केला डान्स, पण सूर्यकुमारने ‘असे’ म्हणत घेतले क्रेडिट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---