भारताचा माजी वेगवान गोलंदाज सलिल अंकोला हा मुंबई संघाच्या निवडसमितीच्या अध्यक्षपदी विराजमान झाला आहे. देशांतर्गत क्रिकेट पुढील महिन्यात होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेने सुरू होत आहे. यासाठी अंकोला मुंबई संघाची निवड करेल.
सलिल अंकोलाने भारताकडून १ कसोटी व २० वनडे सामने खेळले आहेत. कसोटीमध्ये त्यांनी २, तर वनडे क्रिकेटमध्ये १३ विकेट्स घेतल्या आहेत. अंकोला प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये ५४ सामने खेळला आहे. त्यात त्याने १८१ विकेट्स मिळवल्या आहेत. यामध्ये ४७ धावा देत ६ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
“मुंबई क्रिकेट असोसिएशनने २०२०-२१ सत्रासाठी वरिष्ठ संघाच्या निवड समितीसाठी सलिल अंकोला (प्रमुख), संजय पाटील, रवींद्र ठाकेर, जुल्फिकार पार्कर आणि रवी कुलकर्णी यांची नियुक्ती केलेली आहे,” असे आपल्या पत्रकात मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हटले.
अंकालोच्या अध्यक्षतेखालील निवड समितीत इतर सदस्यांमध्ये संजय पाटील, रवींद्र ठाकेर, जुल्फिकार पार्कर आणि रवी कुलकर्णी यांचा समावेश आहे. मुंबई क्रिकेट संघाच्या क्रिकेट सुधारणा समितीमध्ये लालचंद राजपूत (प्रमुख), राजीव कुलकर्णी आणि समीर दिघे यांचा समावेश आहे. दरम्यान मुंबई क्रिकेट असोसिएशनने लवकरच प्रमुख प्रशिक्षकाची घोषणा करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
…म्हणून गिल नाही, तर शॉची केली प्लेईंग इलेव्हनमध्ये निवड; कर्णधार कोहलीने सांगितले कारण
“विराटच्या अनुपस्थितीत रहाणे…”, सचिन तेंडुलकरचे महत्वपूर्ण विधान
आम्ही ‘त्यांचा’ सामना करण्यास उत्सुक, कर्णधार कोहलीकडून मुख्य प्रतिस्पर्ध्यांचा नावानिशी उल्लेख






