Thursday, March 23, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“आयसीसी ट्रॉफी नसली तरी विराट महान कर्णधार”, दिग्गजाने दाखवली सत्य परिस्थिती

March 1, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Virat Kohli

Photo Courtesy: bcci.tv


भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व वरिष्ठ फलंदाज विराट कोहली याच्या नेतृत्वाची सातत्याने चर्चा होत असते. त्याने जवळपास सात वर्ष भारतीय संघाचे नेतृत्व केले. तसेच आयपीएलमध्ये देखील तो 9 वर्ष रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा कर्णधार होता. मात्र या संपूर्ण कालावधीत त्याला एकही स्पर्धा जिंकता आली नाही. या कारणामुळे अनेक जण त्याला अपयशी कर्णधार म्हणत असतात. परंतु, पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट याने विराटची पाठराखण केली.

विराटकडे 2014 मध्ये भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व आले होते. त्यानंतर 2017 मध्ये तो वनडे व टी20 संघाचा कर्णधार बनला. या संपूर्ण कालावधीत भारताला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. तो आयसीसी ट्रॉफी जिंकलेला कर्णधार नसल्याने अनेक जण त्याला अपयशी म्हणताना दिसतात. मात्र, सलमान बटने याबाबत आपले वेगळे मत व्यक्त केले. तो म्हणाला,

“अनेक जण विराटने आयसीसी ट्रॉफी जिंकली नाही म्हणून त्याला अपयशी कर्णधार मानतात. मात्र, मला विचाराल तर परिस्थिती वेगळी आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने आयसीसी ट्रॉफीच्या बाद फेरीपर्यंत मजल मारली. तो एक पराभव म्हणजे एक खराब दिवस किंवा नशिबाची साथ नसणे असतो. त्याच्याच नेतृत्वात भारताने अनेक संस्मरणीय विजय साजरे केले आहेत.”

विराट कर्णधार असताना भारताने 2017 चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. त्यावेळी भारताला पाकिस्तानकडून पराभूत व्हावे लागलेले. त्यानंतर 2019 वनडे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारत इंग्लंडकडून हरलेला. त्या व्यतिरिक्त जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही भारताला  न्यूझीलंडकडून पराभूत व्हावे लागले होते. तर, 2021 टी20 विश्वचषकात भारताने साखळी फेरीतच गाशा गुंडाळलेला.

(Salman Butt Backs Virat Kohli Said He Is Successful Captain Without ICC Trophy)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
थेट ‘सिक्सर किंग’ युवीला पछाडत उमेश ‘स्पेशल’ यादीत! रवी शास्त्रींचा पराक्रमही ध्वस्त
मुंबई इंडियन्सच्या महिला संघाची धुरा ‘या’ दिग्गजाच्या हाती, आता रोहितप्रमाणे तीही लावणार विजेतेपदांची रांग


Next Post
Mumbai-Indians

आला रे! आयपीएलसाठी मुंबई इंडियन्सचे तुफान सज्ज, पूर्ण हंगाम खेळण्याचा दिला शब्द

WPL

बीसीसीआयचा स्वागतार्ह निर्णय! WPL मध्ये मुली-महिलांना मोफत प्रवेश, पुरूषांसाठी तिकिटाचे नाममात्र दर

IND vs AUS (Rohit Sharma)

"असे काही होण्याची अपेक्षाच नव्हती", भारतीय फलंदाजांच्या ढिसाळ कामगिरीवर प्रशिक्षकांची तीव्र नाराजी

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143