---Advertisement---

इंग्लंडमध्ये फ्लॉप झालेल्या पंतला पाकिस्तानी खेळाडूची फटकार; म्हणाले, ‘दिग्गजाशी त्याची तुलना, ना बाबा ना!’

On: शनिवार, सप्टेंबर 4, 2021 1:47 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यात मालिकेतील चौथा कसोटी सामना ओव्हल येथे खेळला जात आहे. ओव्हल कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताची सुरुवात खूपच खराब झाली आणि पुन्हा एकदा भारतीय फलंदाज इंग्लिश गोलंदाजांना शरण गेले. त्यातही या संपूर्ण मालिकेत भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतची बॅट शांत राहिली आहे. यामुळे त्याला बऱ्याच टीकेला सामोरे जावे लागले आहे.

पंत सध्याच्या मालिकेत आतापर्यंत खेळलेल्या ६ डावांमध्ये केवळ ९६ धावा करू शकला आहे. काही काळापूर्वी भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पंतने काही महत्त्वपूर्ण डाव खेळून संघाला सामने जिंकून दिले होते. यामुळे, त्याचे बरेच चाहते आणि तज्ञांनी त्याची तुलना ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक ऍडम गिलख्रिस्टशी केली होती. मात्र, पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट याने हे स्पष्टपणे नाकारले आहे.

सलमान बटने त्याच्या यूट्यूब चॅनेलवरून शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बोलताना रिषभ पंत आणि ऍडम गिलख्रिस्टची तुलना होऊच शकत नसल्याचे म्हटले आहे.

तो म्हणाला, “कृपया रिषभ पंतसारख्या २-३ वर्षांचा अनुभव असलेल्या खेळाडूची तुलना ऍडम गिलख्रिस्टसारख्या जागतिक दर्जाच्या खेळाडूशी करू नका. गिलख्रिस्ट मॅच विनर होता. तो त्याच्या काळात जागतिक दर्जाच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवायचा. आता फक्त काही अव्वल दर्जाचे वेगवान गोलंदाज आहेत आणि पंतने आतापर्यंत फक्त काही चांगल्या खेळी खेळल्या आहेत. पंत हा गिलख्रिस्टच्या दर्जाचा खेळाडू नाही. पंतला खेळाच्या मूळ स्वरूपात टिकण्यासाठी त्याच्या तंत्र आणि मानसिकतेवर काम करावे लागेल. पंतला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे.”

“गिलख्रिस्ट एक प्रभावी खेळाडू होता. तो पूर्णपणे वेगळ्या दर्जाचा फलंदाज आणि यष्टीरक्षक होता. पंतला, फटका लावण्यापूर्वी खेळपट्टीवर उभे राहावे लागेल. त्याच्याकडे अशी योजना नाही जी इंग्लंडसारख्या खेळपट्टीवर उपयुक्त ठरेल,” अशा शब्दात त्यांनी पंतला फलंदाजीत सुधारणेसाठी योजना आखण्याचाही अप्रत्यक्ष सल्ला दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

पोप-अलीची भागिदारी तोडण्यासाठी कोहलीचा जडेजासंगे ‘मास्टरप्लान’ अन् पुढच्याच चेंडूवर खेळ खल्लास

‘त्याच्यावर गरजेपेक्षा जास्तच विश्वास दाखवतोय कर्णधार’, माजी क्रिकेटरने केली जडेजाची थट्टा

‘सीएसके, सीएसके…’, मोईनला पाहून भारतीय चाहत्यांची नारेबाजी; अष्टपैलूही झाला ‘असा’ रिऍक्ट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---