---Advertisement---

जिद्दीला सलाम! भारतीय खेळाडूला गंभीर दुखापत, तरीही पट्टी बांधून आला फलंदाजीला

Haryana Vs Tamilnadu
---Advertisement---

विजय हजारे ट्रॉफी 2023 चा उत्साह शिगेला पोहोचला आहे. या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना हरियाणा विरूद्ध तामिळनाडू यांच्यात राजकोट येथे झाला. या सामन्यादरम्यान तामिळनाडूचा सलामीचा फलंदाज बाबा इंद्रजित गंभीर जखमी झाला होता. असे असतानाही त्याने हार न मानता तोंडावर चिकटटेप लावून आपल्या संघासाठी मैदानात लढत राहिला. मात्र, या संघर्षानंतरही तो आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. परिणामी तामिळनाडू संघाला हरियाणाविरुद्ध 63 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

विशेष बाब म्हणजे बाबा इंद्रजीत ( Baba Indrajeet) याच्यासोबतचा हा धोक्कादायक अपघात मैदानात खेळताना घडला नसून डावाच्या ब्रेकदरम्यान घडला. विरोधी संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना तामिळनाडूने 14 षटकांत एकूण 53 धावांत तीन विकेट्स गमावल्या होत्या, त्यानंतर इंद्रजित तोंडाला चिकटटेप लावून फलंदाजीला आला. सामन्यादरम्यान, त्याला 16 व्या षटकात वैद्यकीय डाॅक्टरला मैदानावर बोलावावे लागले.

मिळालेल्या माहितीनुसार, बाबा इंद्रजीत घसरून बाथरूममध्ये पडल्याने जखमी झाला आहे. त्यामुळे त्याच्या ओठाला गंभीर दुखापत झाली आहे. असे असूनही त्याने हार मानली नाही. तो मैदानात आपल्या संघासाठी फलंदाजीसाठी आला आणि त्याने 71 चेंडूत 64 धावा केल्या. (Salute to stubbornness Indian player seriously injured still bandaged to bat)

महत्वाच्या बातम्या

भारताच्या रणरागिनींचा जलवा! पदार्पणाच्या कसोटीत शुभा अन् जेमिमाने झळकावली फिफ्टी, संघ मजबूत स्थितीत
माजी दिग्गज वेगवान गोलंदाजाचा धक्कादायक खुलासा; म्हणाला, ‘मी बाबरला कर्णधारपद…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---