David Warner Six: ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संघातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 14 डिसेंबरपासून पर्थ येथे सुरुवात झाली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी सलामीला उतरलेल्या डेविड वॉर्नर याने आपल्या फलंदाजीचा जलवा दाखवत पाकिस्तानी गोलंदाजांना चांगलाच चोप दिला. यादरम्यान त्याने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर शाहीन आफ्रिदी याच्या गोलंदाजीवर असा काही षटकार मारला, ज्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
खरं तर, ऑस्ट्रेलियाने लंच ब्रेकपर्यंत खेळताना 25 षटकात 117 धावा केल्या आहेत, ज्यात डेविड वॉर्नर (David Warner) याने वादळी अंदाजात फलंदाजी करताना 67 चेंडूत 72 धावांची अर्धशतकी खेळी केली. या धावा करताना वॉर्नरच्या बॅटमधून 1 षटकार आणि 11 चौकारांची बरसात झाली. वॉर्नरचे हे कसोटीतील 37वे अर्धशतक ठरले आहे.
विस्फोटक फलंदाज वॉर्नर त्याची अखेरची कसोटी मालिका खेळत आहे. ही मालिकादेखील तो आपल्या फलंदाजीने यादगार बनवताना दिसत आहे. वॉर्नरने वेगाने फलंदाजी करत गोलंदाजांना घाम फोडला. खासकरून वॉर्नरने शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) याच्या गोलंदाजीवर गुडघ्यावर बसून गगनचुंबी षटकार मारत गोलंदाजालाही हैराण केले. खरं तर, ऑस्ट्रेलियाच्या डावातील 22वे षटक आफ्रिदी टाकत होता. त्याच्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर वॉर्नरने बसून स्क्वेअर लेगवर शानदार षटकार मारला. हा एक असा शॉट होता, जो पाहून प्रत्येकजण चकित झाला.
Shot from David Warner! 😍pic.twitter.com/HQkHQt82C0
— CricketGully (@thecricketgully) December 14, 2023
ट्वीट व्हायरल
वॉर्नरने ज्या अंदाजात आफ्रिदीच्या चेंडूवर बसून षटकार मारला, ते पाहून चाहते सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत. आफ्रिदीच्या गोलंदाजीवर अशाप्रकारचा षटकार मारणे कोणत्याही फलंदाजासाठी सोपे नसते. मात्र, हा शॉट पाहून एका युजरने ‘वेडेपणा’ असे लिहित वॉर्नरचा फोटो शेअर केला आहे.
Insane six against Shaheen Afridi by David Warner. pic.twitter.com/3YxESSH7YQ
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 14, 2023
आता वॉर्नर नाबाद असून त्याने 38 षटकांचा खेळ होईपर्यंत 106 चेंडूत 1 षटकार आणि 12 चौकारांच्या मदतीने 88 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, वॉर्नरने त्याचे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी फक्त 41 चेंडूंचा सामना केला होता. (cricketer david warner toying with shaheen afridi sitting down and hit a six video viral aus vs pak 1st test)
हेही वाचा-
वर्ल्डकपच्या 25 दिवसांनंतर शमीचा मोठा खुलासा; म्हणाला, ‘Final हारल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये कुणीच कुणाला…’
‘अभिमानाने सांगतो, मी मुस्लिम आहे…, मला कोण रोखणार?’, Sajda Controversyवर शमीचे मोठे विधान