---Advertisement---

‘अभिमानाने सांगतो, मी मुस्लिम आहे…, मला कोण रोखणार?’, Sajda Controversyवर शमीचे मोठे विधान

Mohammed-Shami
---Advertisement---

Mohammed Shami on Sajda: आयसीसी वनडे विश्वचषक 2023 पार पडून आता महिना होत आला आहे. या स्पर्धेत भारताचा हुकमी एक्का मोहम्मद शमी चांगलाच चमकला होता. शमीने आपल्या भेदक गोलंदाजीने फलंदाजांना चांगलाच घाम फोडला होता. खरं तर, त्याला सुरुवातीचे 4 सामने खेळायची संधी मिळाली नव्हती. त्यानंतर त्याला मिळालेल्या संधीचं त्याने सोनं केलं. त्याने 7 सामन्यात कहर गोलंदाजी केली. त्याने 5.26च्या सरासरीने सर्वाधिक 24 विकेट्स नावावर केल्या होत्या.

मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात अक्षरश: कहर केला होता. त्या सामन्यातील एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता, ज्यात शमी 5 विकेट्स घेतल्यानंतर जमिनीवर बसला होता. त्यावेळी पाकिस्तानच्या लोकांनी सोशल मीडियावर गरळ ओकत म्हटले होते की, शमी भारतीय मुस्लिम (Shami Indian Muslim) आहे, त्याला सजदा (Sajda) करायचा आहे, पण तो घाबरला आणि भारतात घाबरून हे करू शकला नाही.

‘अडचण असती तर भारतात का राहिलो असतो’
आता माध्यमांशी संवाद साधताना शमीने या विषयीच्या प्रश्नावर म्हटले की, “अभिमानाने सांगतो की, मी मुस्लिम आहे. जिथे प्रार्थना करायची असेल, तिथे करेल. मला कोण रोखणार?” खरं तर, शमी बुधवारी (दि. 13 डिसेंबर) आजतकच्या अजेंडा कार्यक्रमात सामील झाला होता. दरम्यान बोलताना त्याने या प्रश्नाचे उत्तर देत पाकिस्तान चाहत्यांची बोलती बंद केली.

शमी म्हणाला, “ज्याला सजदा करायचा असेल, तर कोण रोखणार? मला करायचा असेल, तर करेल. मी मुस्लिम आहे. अभिमानाने सांगतो मी मुस्लिम आहे. मी भारतीय आहे आणि अभिमानाने सांगतो की मी भारतीय आहे. यात समस्या काय आहे? जर मला काही समस्या असती, तर मी इथे भारतात राहायलाच नको होते. जर मला सजदा करण्यासाठी कुणाची परवानगी घ्यावी लागत असेल, तर मी इथे का राहू?”

‘भारतात कोणत्याही व्यासपीठावर सजदा करू शकतो’
पुढे बोलताना शमी म्हणाला की, “मीदेखील इंस्टाग्रामवर त्या सर्व गोष्टी पाहिल्या आहेत की, मी सजदा करू इच्छित होतो आणि केले नाही. अरे भावांनो, मी असे यापूर्वी कधी केले आहे का? 5 विकेट्स मी यापूर्वीही घेतल्या आहेत, तेव्हा मी सजदा केला नाही. मात्र, ज्या दिवशी मला सजदा करायचा असेल, तर मला सांगा ना कुठे करायचा आहे. मी भारतातील प्रत्येक व्यासपीठावर सजदा करेल. त्यावेळी मला कुणीही प्रश्न विचारून पाहा. हे लोक फक्त त्रास देतात. त्यांचे कुणावरही प्रेम नाही.”

शमी असेही म्हणाला की, “ते सहावे षटक होते आणि 3 विकेट्स तर पडल्याच होत्या. इथे माझ्या डोक्यात होते की, पुढील 3-4 षटकात 5 विकेट्स घ्याव्या. त्यावेळी मी 200 टक्के योगदान देत होतो. आपल्या क्षमतेपेक्षा जास्त आणि मी थकलो होतो. जेव्हा मी 5 विकेट्स घेतल्या, तेव्हा गुडघ्यावर बसलो होतो. लोकांनी त्याचेच मीम्स बनवले. लोक इतके फ्री आहेत की, त्यांच्याकडे काहीच काम नाहीये.”

शमी कसोटी खेळण्यासाठी सिद्ध करावी लागेल फिटनेस
भारतीय संघ (Team India) सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघात 3 टी20, 3 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. टी20 मालिकेतील 2 सामने पार पडले आहेत. यात भारत 0-1ने पिछाडीवर आहे. शमीला आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिका खेळायची आहे. मात्र, यासाठी त्याला त्याचा फिटनेस सिद्ध करावी लागेल. (indian pacer mohammed shami reaction on sajda at ground during icc world cup 2023 photo viral shami on pakistan fans know here)

हेही वाचा-
INDvsSA 3rd T20: ‘करो या मरो’ सामन्यात खेळपट्टी कुणाच्या फायद्याची? पाऊस करणार का एन्ट्री? वाचा सगळं काही
राजकोटमध्ये घडला इतिहास, विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पहिल्यांदाच खेळणार हरियाणा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---